राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान , अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी अजहर सय्यद,कार्याध्यक्षपदी बबलू शेख
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी अजहर सय्यद,कार्याध्यक्षपदी बबलू शेख
अमळनेर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अमळनेर शहर अल्पसंख्याक विभागाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाच्या विचारांना बळ देण्यासाठी आणि समाजसेवेसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी अमळनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजहर सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आमदारांनी त्यांचे स्वागत करून त्यांची राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.यासोबतच एम आय एम चे तालुकाध्यक्ष बबलू शेख यांनीही प्रवेश केल्याने त्यांची अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्षपदी,तर जिल्हा सरचिटणीस (अल्पसंख्याक विभाग) – असलमभाई यांची नियुक्ती करण्यात आली.सदर पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देताना त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आपल्या कार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा अधिक बळकट व्हावी. सर्वसामान्य जनतेसाठी लोकहिताची, विकासाभिमुख आणि समाजोपयोगी कामे अधिक प्रभावीपणे घडावीत, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन राजपुत, माजी युवक अध्यक्ष इम्रान खाटीक,शहर कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर,सरचिटणीस जुनेद शेख,युवक अध्यक्ष दुर्गेश पाटील,अलीम मुजावर उपस्थित होते.

