देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिवस साजरा….
![]()
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये संविधान दिवस साजरा….
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा करण्यात आला…
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.

अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
इयत्ता आठवीतील अर्पीता बोरसे,तनुश्री सोनवणे, इयत्ता नववीतील शुभांगी पाटील हिने मनोगत तर गिरीजा माळी,वैष्णवी महाजन, वैष्णवी पाटील यांनी संविधानाचे वाचन केले.
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने सध्याची राज्यघटना स्वीकारली. त्यामुळे या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी देशात सर्वत्र ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. आपल्या देशाचे सर्व कायदे या राज्यघटनेने बनवलेले आहेत असे सांगितले


तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.आर.महाजन यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी,अरविंद सोनटक्केसह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.


