या पाच वर्षात युवक युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी भूमिपुत्र अनिल दादा कटिबद्ध. – गौरव रावसाहेब पाटील(मारवड).
![]()
या पाच वर्षात युवक युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी भूमिपुत्र अनिल दादा कटिबद्ध. – गौरव रावसाहेब पाटील(मारवड).
◼️म्हणूनच तालुक्यातील युवक म्हणतात
*”बच्चा बच्चा कहता है…*
*भुमिपुत्र च सच्चा है…”*
तालुक्यातील युवक युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र आमदार मंत्री दादासो. अनिल भाईदास पाटील हेच नेहमी अग्रेसर राहिल्यामुळे तालुक्यातील युवकांचे मोठे पाठबळ मिळत असल्याचे मत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कनिष्ठ महाविद्यालय मा. तालुकाध्यक्ष गौरव रावसाहेब पाटील (मारवड) यांनी व्यक्त केले आहे. या ५ वर्षाच्या कार्यकाळात पोलीस भरती असो वा विविध प्रकारच्या भरती व शैक्षणिक कामासाठी असो त्या साठी लागणारे अनेक कागदपत्रे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी दादा नेहमी कटिबद्ध राहिले आहेत. दादांच्या आमदारकी च्या सुरुवातीच्या काळात अनेक गावात तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी व्यायमाचे साहित्य, अनेक गावात व्यायमशाळा, भरती व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक,युवतींना अनेक प्रकाशनाचे पुस्तके, क्रिडा साहित्य, व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी तालुकास्तरावर क्रिडा संकुल भरीव निधीचे योगदान दादांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. व अनेक युवकांच्या समस्या मंत्री अनिल दादा पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत. म्हणून यंदाच्या निवडणुकीत तालुक्यातील अनेक युवक भूमिपुत्र आमदार मंत्री अनिल दादा पाटील यांच्या मागे उभे असून भूमिपुत्र अनिल दादा बहुमताने निवडून येतील असा विश्वास गौरव रावसाहेब पाटील (मारवड) यांनी व्यक्त केला आहे.

