ठाणे जिल्ह्यातील आरएसपी युनिट निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत, विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये आर एस पी शिक्षकांचे बहुमूल्य सहकार्य लाभत असून आर एस पी चे कार्य खरोखर अभिमानास्पद-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे.
![]()
ठाणे जिल्ह्यातील आरएसपी युनिट निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत.
विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये आर एस पी शिक्षकांचे बहुमूल्य सहकार्य लाभत असून आर एस पी चे कार्य खरोखर अभिमानास्पद आहे: जिल्हाधिकारी अशोक शिनगारे.
ठाणे:कल्याण(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन,नागपूर अंतर्गत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात निवडणूक आयोगाचा प्रक्रियेसाठी, मा.ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आदरणीय श्री.अशोक शिनगारे साहेब,यांचा आदेशानुसार, व पोलीस आयुक्त आदरणीय श्री.आशुतोष डुंबरे साहेब, ठाणे जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पालघर विभागीय आर एस पी अधिकारी युनिट कमांडर श्री. मनिलाल रतिलाल शिंपी,व श्री.दिलीप स्वामी यांचा मार्गदर्शनाखाली, ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे, उपसमादेशक श्री.विनोद शेलकर, भिवंडी,शहापूर समादेशक श्री.मंगेश भामरे यांचा सहकार्याने एनएसएस/ एन सी सी चे छात्रसैनिक यांना निवडणूक प्रक्रियेत स्वयंसेवक म्हणून कर्तव्य करण्यासाठी नियमांबाबत अंमल बजावणीसाठी प्रशिक्षण देण्यात आले, आर एस पी अधिकारी युनिटचे ठाणे शहर समादेशक श्री. बाळा साठे,श्री. सुनिल पाटील,श्री. सतिश पाटील, श्री.आदिनाथ पालवे,श्रीमती सविता पालवे,ठाणे जिल्ह्यात निवडणूक आयोग अंतर्गत , जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार ठाणे पालघर विभागीय आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी,व श्री.दिलीप स्वामी यांचा नेतृत्वाखाली,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक श्री.जितेंद्र सोनवणे, उपसमादेशक श्री.विनोद शेलकर, भिवंडी,शहापूर समादेशक श्री.मंगेश भामरे व श्री.गोपाळ दिक्षित,श्री.योगेश कापडणे, उल्हासनगर चे समादेशक संतोष गोरडे,यांचा विशेष सहकार्याने , आर एस पी अधिकारी श्री.दिगंबर जोगमार्गे,श्री.शरद बोरसे,श्री.श्री.संजय चौधरी, श्री.करणसिंह जडेजा,श्री.संजय फिरके, श्री.संग्रामसिंग राजपूत,अंबरनाथ बदलापूर येथील समादेशक श्री.दत्तात्रय पाटील,श्री.रवी जाधव,श्री.दत्तात्रय पटवर्धन, श्री.गोपाळराव डीक्कुल्ला, श्री.योगेश अहिरे, विशाल सोनवणे, प्रा.सुभाष गायकवाड,भिवंडी येथे श्री.दिवाकर वाघ,श्री.राजाराम पवार, श्री.सुमित तांबडे, श्री.युवराज ठाकूर तर कळवा मुंब्रा येथे समादेशक श्री.संजय खैरनार यांच्यासह श्री.उमाकांत बोके, श्री.विजय हिलीम, श्री.किरण भोई,श्री.संतोष भोसेकर यांची निवडणूक समन्वय अधिकारी/ विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून यांचा मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक नेमनुकीचे नियोजन करण्यात येत आहे. हे सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार 2024 चा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात प्रशासनासोबत जिल्हा निवडणूक समन्वय अधिकारी तथा जिल्हा विशेष पोलीस अधिकारी म्हणून ठाणे पालघर विभागाचे आर एस पी कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जिद्दीने व प्रामाणिकपणे नियमांचे काटेकोर पालन करून पोलीस प्रशासन व निवडणूक निर्णय अधिकारी यांचा आदेशानुसार एनएसएस व एनसीसी चे छात्रसैनिक स्वयंसेवक म्हणून उपलब्ध करून देण्यात मोलाचे सहकार्य करीत आहेत त्याबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय श्री. अशोक शिनगारे साहेब ,पोलीस आयुक्त माननीय श्री.आशुतोष डुंबरे साहेब त्यांच्यासह आदरणीय तहसीलदार, नायब तहसीलदार, व संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन,नागपूर अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील आरएसपी अधिकारी शिक्षकांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.तसेच महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष श्री. संजय शेंडे व उपाध्यक्ष पी. एस. महाजन महासमादेशक अनिल शेजाळे, गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


