“शिरीष दादा चौधरींचा वाढता प्रभाव: विरोधकांच्या आरोपांचा परिणाम नाही!”
![]()
“शिरीष दादा चौधरींचा वाढता प्रभाव: विरोधकांच्या आरोपांचा परिणाम नाही!”
अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर तालुक्याचे माजी आमदार आणि अपक्ष दबंग उमेदवार शिरीषदादा चौधरी यांच्या ग्रामीण भागातील वाढत्या प्रभावामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या चुकीच्या आरोपांद्वारे विरोधक आपल्या कमकुवत पातळीचे प्रदर्शन करत आहेत, पण अमळनेरकर जनता सुज्ञ आहे, हे विसरणे त्यांना महागात पडणार आहे.
शहर आणि ग्रामीण भागातील मतदार बांधव भगिनी मोठ्या प्रमाणावर शिरीष दादा चौधरी यांना प्रचंड पाठिंबा देत आहेत. “एकच आवाज, एकच वादा- शिरीषदादा” अशा घोषणांनी अमळनेर तालुक्यामध्ये एकजूट साधली आहे. त्यांच्या वाढत्या समर्थकांच्या साक्षीने नागरिक, मतदार, आणि मित्रपरिवार त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत.
आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या निवडणुकीच्या चर्चेदरम्यान, ग्रामीण भागात जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. विरोधक फक्त आरोपांमध्ये गुंतलेले असून, तालुक्यात विकास खुंटलेल्याच्या समस्येवर चर्चा चालू आहे.
जातिव्यवस्थेच्या राजकारणाच्या पलीकडे काहीही केले नसल्याचे मतदार बांधव भगिनींमध्ये बोलले जात आहे. अशा वातावरणात शिरीष दादा चौधरींचे वाढते प्रभाव विरोधकांना चिंतित ठेवण्यास पुरेसा आहे.

