दोन्ही दादांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये महाविकास आघाडीचे डॉ अनिल शिंदेच योग्य उमेदवार अशी होत आहे मतदारांमध्ये चर्चा
![]()
दोन्ही दादांच्या आरोप प्रत्यारोपामध्ये महाविकास आघाडीचे डॉ अनिल शिंदेच योग्य उमेदवार अशी होत आहे मतदारांमध्ये चर्चा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “दोन्ही दादा नको, आता डॉक्टर अनिल शिंदे हवे आहेत” अशी चर्चा सध्या तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रचंड जोरात आहे. वैद्यकीय क्षेत्रात एक प्रख्यात सर्जन म्हणून डॉक्टर अनिल शिंदे यांचा लौकिक आहे, आणि त्यांनी आजपर्यंत अनेक मोठ्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना अमळनेर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे, ज्यामुळे अमळनेरमधील सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचारासाठी उत्सुक झाले आहेत. चिकित्सकांची ही उमेदवारी स्थानिक जनतेसाठी एक मोठी संधी मानली जात आहे, आणि या परिस्थितीत डॉक्टर शिंदे यांना फायदा होईल अशी चर्चा सुरू आहे.
तथापि, अमळनेर तालुक्यात विकासामध्ये गंभीर चिंतांचा सामना करावा लागत आहे. कागदावर असलेली मोठमोठी आकडेवारी प्रत्यक्षात नाजूक परिस्थितीत रूपांतरीत झाली आहे. बेरोजगारी, वाढता गुन्हेगारीचा आलेख, व रस्त्यांचे खराब अवस्थेने महत्त्वपूर्ण समस्यांना जन्म दिला आहे.
शेतकऱ्यांचे समस्यांचे सावट कायम आहे, कारण त्यांना हमीभाव मिळत नाही. सध्या शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे. या तणावाच्या वातावरणात भरती प्रक्रियाही ठप्प झालेली आहे, जेणेकरून बेरोजगारी आणखी वाढते आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागले आहे, परंतु त्यांना आवश्यक प्रतिसाद सरकारकडून अद्याप मिळालेला नाही.महाविकास आघाडी या संदर्भात जुनी पेन्शन देऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. अशा भरीव चर्चांच्या पार्श्वभूमीवर, डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्त्वात अमळनेरच्या विकासाला एक नवीन दिशा मिळेल अशी सध्या चर्चा सुरू आहे..

