पत्रकारिता हे लोकशिक्षण व समाजशिक्षणाचे एक माध्यम-विलासराव पाटील मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनाला १० कर्तुत्ववान व्यक्तींचा झाला सन्मान
![]()
पत्रकारिता हे लोकशिक्षण व समाजशिक्षणाचे एक माध्यम-विलासराव पाटील
मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनाला १० कर्तुत्ववान व्यक्तींचा झाला सन्मान
अमळनेर प्रतिनिधी-
पत्रकारिता हे लोकशिक्षण व समाजशिक्षणाचे एक माध्यम आहे. पूर्वीही ते होते. आज ही आहे आणि उद्याही राहणार आहे, पण लोकशिक्षण, समाजशिक्षण म्हणजे काय याच्या आकलनात काळानुरूप बदल होत गेल्याने पत्रकारितेची रूपे बदलत गेली आहेत. आता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बातमी एकाच सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत येते… डिजिटल मीडियामुळे प्रिंट मिडियालाही ही बदलावे लागले आहे..
प्रिंट मीडिया कमी होत होत असून वेब पोर्टल, चॅनल्स वाढत आहेत. डिजिटल युगात मेसेज फॉरवर्ड करतांना जागरुक असणे आवश्यक आहे असे मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने कर्तृत्व गौरव सन्मान कार्यक्रमात
महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी चे संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी सांगितले.
अगोदर बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले..
विचारपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नाशिक चे आदिवासी विकास महामंडळाचे उपयुक्त कपील पवार, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर, देवगाव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील ,ज्येष्ठ साहित्य प्रा वा.ना आंधळे, सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा डॉ.एस.ओ.माळी, मराठी वाड्:मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ डिगंबर महाले होते
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी लाईव्ह न्युज चे संपादक ईश्वर महाजन यांनी केले.
एखादं पद मिळवणं व ते टिकवण्यासाठी व्यक्तीमत्व चांगलं असावं लागतं. एखाद्या कृतीला स्वतःचे उत्तर असावं. ज्येष्ठ लोकांकडून तो ठेवा जपायला हवा असे विचार आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे उपायुक्त कपिल पवार यांनी व्यक्त केले.
नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ जयदीप पाटील म्हणाले की, ज्यांना कर्तृत्व गौरव पुरस्कार मिळाला ते सर्व कार्यकर्तृत्वाचे दिवे आहेत. ते सतत तेवत राहतात तेव्हा समृध्द भारत तयार होतो. एखाद्या सिग्नल वर कोण कशी शिटी वाजवतो यावर तो देश कसा ? तेथील संस्कृती कशी ? हे ठरत असते. पेड न्यूज च्या काळात सत्ताधाऱ्यांच्या मदमस्तीला अंकुश लावण्यासाठी, सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करु शकतो. मतदानाचे तुम्ही शस्त्रधारी, देशाच्या संस्कृतीचे केंद्रबिंदू आहात. व्हाटस्अप, इंस्टाग्राम, फेसबुकवर श्रध्देचे रुपांतर अंधश्रध्देत नको. श्रध्दा हा देशाचा आत्मा असून अंधश्रध्देला हात लावावा असे ही ते म्हणाले.
निवृत्त डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांनी पाच वर्षाच्या अल्प काळात मराठी लाईव्ह न्युज पोर्टलने केलेली प्रगती व सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ साहित्यिक वा.ना.आंधळे म्हणाले की पत्रकारिता केवळ माहितीचा प्रसार करण्याचे माध्यम नाही, तर तो समाजाचे आरसा आहे. वेब मिडीया मराठीने आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित केले आहे, हे निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे. असे ज्येष्ठ साहित्यिक प्रा वा.ना आंधळे अमळनेर ला मराठी लाईव्ह न्युज च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने कर्तुत्व गौरव सन्मान सोहळा मध्ये कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना बोलत होते..
एखादया मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापन दिनाला दरवर्षी कर्तुत्ववान व्यक्तीचा सन्मान होणे ही अभिमानाची गोष्ट आहे अध्यक्षीय भाषणात व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ डिगंबर महाले यांनी सांगितले..
‘कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२४’ चे मानकरी
१) मंगळ ग्रह सेवा संस्थां अमळनेर अध्यात्मिक क्षेत्र २)विजय पाटील स्वादिष्ट नमकीन अमळनेर युवा उद्योजक३)प्रा सुभाष पाटील कृषी क्षेत्र ,४) डॉ प्रशांत शिंदे वैद्यकीय क्षेत्र ५)सौ सुषमा पाटील राजकीय क्षेत्र ६) शरद धनगर क्षेत्र साहित्यिक७)आर.आर.सोनवणे क्षेत्र शैक्षणिक ८) सुनील वाघ क्षेत्र क्रीडा ९)सौ छाया पाटील पोलिस पाटील क्षेत्र सामाजिक१०)सागर कोळी युवा प्रेरणा पुरस्कार यांना मान्यवरांच्या हस्ते
शाल, बुके, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
सोबतच व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी डॉ. डिगंबर महाले, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पदी संजय सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तर उत्कृष्ट डिझाईनर कामासाठी सहकार्य करणारे लक्ष्मीकांत सोनार यांचादेखील मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी मराठी लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक ईश्वर महाजन व कार्यकारी संपादिका ज्योती ईश्वर महाजन यांचा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत सत्कार केला.

कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती-
प्रा अशोक पवार,वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या संचालीका योजना पाटील,संचालक राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील,भूगोल मंडळाचे अध्यक्ष मुकेश पाटील, मंडळाचे माजी अध्यक्ष दीपक पवार,सचीव दिलीप पाटील, सानेगुरुजी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक बी.एस.जाधव, उदयोजक निलेश पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास पाटील ,मुख्याध्यापक प्रकाश पाटील, निवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस.डी.देशमुख
साई क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर, जाधव इंग्लिश क्लासेस चे संचालक विनोद जाधव,डॉ विशाल बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील,मधु बाळापूरे,, महेश पाटील, दशरथ लांडगे, डिझायनर लक्ष्मीकांत सोनार,रवींद्र चौधरी, अर्बन बँकचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ रवींद्र चौधरी,मा.सरपंच नरेंद्र पाटील, जगदीश पाटील, मा.गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे,
मकसूदभाई, भद्रा प्रतीक चे संचालक दीपकजी साळी, गोपाल हडपे ,निरंजन पेंढारे,प्रा डॉ सुरेश माहेश्वरी,सुधीर चौधरी,मुख्याध्यापक अनिल चौधरी, हर्षल पाटील, अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश माळी,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर, क्षत्रिय फुलमाळी समाजाचे सचिव ग्रामसेवक विजय माळी,
हर्षल पाटील,भरत पाटील सर, काँग्रेसच्या महिला प्रमुख संगीता प्रमोद पाटील, योगेश नाना पाटील, केंद्रप्रमुख गोकुळ आबा पाटील, विठ्ठल पाटील
सहमंगळ ग्रह संस्थेचे सर्व पदाधिकारी,पत्रकार मित्र,हिंदी अध्यापक मंडळ, वाचनालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ,सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार, व्हॉइस मीडिया चे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक व विविध पदाधिकारी बंधू व भगिनी उपस्थित होते.
उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त
वसुंधराताई दशरथ लांडगे यांनी केले..









