*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..*
1 min read

*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..*

Loading

*’मराठी लाईव्ह न्यूज वेब पोर्टल’ एक व्यापक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळ..*
माणसाला जीवन जगत असतांना मूलभूत गरजा भागविण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे, प्रतिष्ठा सांभाळणे, परोपकार करणे, अन्यायाला वाचा फोडणे इत्यादी गोष्टी माणूस म्हणून करणे गरजेचे असते..तेव्हाच समाजातील आपली प्रतिमा उजळून निघते.. आणि येणारी पिढी आपल्याला चिरकाल स्मरणात ठेवते. आजच्या संगणकीय युगात कोणतीही अभिलाषा न ठेवता कुणाला मदत करणे,कोणाच्या प्रश्नांना वाचा फोडणे दुरापास्तच.. पण आमचे मार्गदर्शक मित्र, पत्रकार क्षेत्रातील देवमाणूस आदरणीय श्री ईश्वर रामदास महाजन हे याला अपवाद म्हणता येतील.. पेड न्यूजच्या जमान्यात त्यांनी शैक्षणिक सामाजिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धी दिली.
ईश्वर महाजन यांनी पत्रकारिता क्षेत्रात 2001 आपले पाऊल ठेवले.ते सर्वप्रथम दैनिक देशोन्नतीला कळमसरे या त्यांच्या गावात काम करत होते. कोणत्याही क्षेत्रात काम करताना अनेकांचे मार्गदर्शन आपल्याला लाभलेले असते. त्यामुळेच ईश्वर महाजन यांना गावाचे पत्रकारिता क्षेत्रातले भूषण भाऊसाहेब,जी.टी. टाक, महात्मा फुले हायस्कूल देवगाव संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश भाऊ पोहरे, दैनिक साईमत चे मुख्य संपादक प्रमोदभाऊ ब-हाटे, ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले,अरविंद सोनटक्के,जेष्ठ साहित्यिक,मार्गदर्शक  विजय लुल्हे जळगाव यांचे सहकार्य मार्गदर्शन लाभले..
दैनिक देशोन्नतीत कळमसरे वार्ताहर म्हणून आठ वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर पुढे त्यांना अमळनेर शहर प्रतिनिधी म्हणून एक वर्ष दैनिक देशोन्नतीने जबाबदारी दिली. दैनिक साईमतला पाच वर्षे अमळनेर तालुका प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पार पाडली..यानंतर मात्र, ‘आपले स्वतःचे एक वेब पोर्टल असले पाहिजे’ अशी एक कल्पना मनात आली. आणि या कल्पनेला मूर्त रूप 11 नोव्हेंबर, 2020 रोजी मिळाले. त्यांनी ‘मराठी लाईव्ह न्युज’ या वेब पोर्टलची त्यादिवशी मुहूर्तमेढ केली….मराठी लाईव्ह न्युज या वेब पोर्टलचे एकच ब्रीद वाक्य आहे,’बातमी, तुमची,आमची, सर्वांची’ आणि किती समर्थक हे ब्रीद वाक्य त्यांनी पुढे जाऊन ठरवले.. याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक बातमीतून येते.. अतिशय वेगवान वृत्तांकन आणि बातमीचा नेमका वेध त्यांची लेखणी नेहमीच घेत असते.. तालुकास्तरीय राजकीय शैक्षणिक सर्व बातम्या या पोर्टलच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात.. वाचकाला या माध्यमातून एक वेगळं समाधान ते देण्याचा प्रयत्न करतात..
मराठी लाईव्ह न्युज ची स्थापना करतांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हार्दिक विचार मनात घेऊन आणि पत्रकारिता हा व्यवसाय नसून, ती एक समाजसेवा आहे.. ही बाब डोळ्यासमोर ठेऊन पोर्टल चे काम सुरु झाले. राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे ‘मराठी लाईव्ह न्युज वेब पोर्टल’ अशी ओळख या पोर्टलची अल्पावधीतच झाली..
बऱ्याच वेळा शैक्षणिक बातम्या प्रसिद्ध करतांना अनेक शिक्षकांना, शाळांना समस्या निर्माण होत असतात.. कार्यक्रम घेतले जातात पण प्रसिद्धी मिळत नाही.. अशावेळी
शाळांमधील वेगवेगळे उपक्रंमाना मराठी लाईव्ह न्युजने नेहमीच प्रसिद्धी दिली आहे..मराठी लाईव्ह न्युज हे फक्त अमळनेर तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले नाही..तर त्याचा वाचक वर्ग,जाहिरातदार वर्ग अनेक जिल्ह्यांमध्ये झाला..
मराठी लाईव्ह न्युज च्या तिसऱ्या वर्धापन दिनाला वाचक, जाहिरातदार यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मराठी लाईव्ह न्युजने अनेक क्षेत्रातील बातम्यांना येथे प्रसिद्धी दिली आहेच. परंतु अनेक साहित्य,शैक्षणिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रातील वैचारिक लेख सुद्धा मराठी लाईव्ह न्यूजने नेहमी प्रसिद्ध केले आहेत..
यात साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर, डॉ.मिलिंद बागूल, गोकूळ बागूल, सोपान भवरे, शरद पाटील,यांच्या वैचारिक लेखनाची मेजवानी वाचकांना ‘मराठी लाईव्ह न्युज’च्या माध्यमातून चाखायला मिळते..

 

‘मराठी लाईव्ह न्युज’ वर्धापन दिनाला जाहिरातदार, वाचक व मित्रपरिवार फक्त शुभेच्छा देतील.. इतपत मर्यादा ठेवली नाही..तर मराठी लाईव्ह न्युज च्या वर्धापन दिनाला वेगवेगळ्या वक्त्यांची वैचारिक व्याख्याने आयोजित केलेत…त्यात अनेक वक्ते त्याचबरोबर सामाजिक,राजकीय नेतेमंडळी या भव्य-दिव्य वर्धापन दिनाला आवर्जून उपस्थित असतात.त्याचबरोबर समाजात अनेक व्यक्ती अशा असतात, ज्यांचे काम खूप मोठे असते. पण ते प्रसिद्धीपासून दूर असतात.अशा वेळी मराठी लाईव्ह न्यूज नागरिकांकडून कानोसा घेऊन त्यांची मुलाखत घेत ‘मराठी लाईव्ह न्युज’ च्या वर्धापन दिनाला त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान घडवून आणते. त्यांना भविष्यात प्रेरणा मिळावी..म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्याचा मानस यापुढे डोळ्यासमोर ठेवला.. मागच्या वर्षी विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांना ‘सत्कार कर्तृत्वाचा’ हा सन्मान आयोजित करून दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करून वर्धापन दिवस उत्साहात साजरा केला होता.
ह्यावर्षीही विविध क्षेत्रातील नऊ मान्यवरांना सन्मान गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रमासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस ‘डॉ. डिगंबर महाले,आदिवासी महामंडळाचे उपआयुक्त कपिलदादा पवार, नाशिक, नोबेल फाउंडेशनचे डॉ. जयदीप पाटील,सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी.सुनील नंदवाडकर,देवगाव देवळी हायस्कूलचे चेअरमन विलासराव पाटील, प्रा.डॉ. एस.ओ.माळी,डॉ.एस. आर.चौधरी, मराठी वाड्:मय मंडळाचे उपाध्यक्ष, शामकांत भदाणे, साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच असते…
मराठी लाईव्ह न्युज या वेब पोर्टलला त्यात विशेष प्रतिनिधी मुंबईचे उदय नरे सर, सोपान भवरे,जयसिंग वाघ,प्रा.अतूल इंगळे जळगाव,डॉ.रवींद्र भोळे पुणे,शशिकांत हिंगोणेकर, मनीलाल शिंपी,ठाणे,डॉ.मिलिंद बागूल,भरत शिरसाट एरंडोल,पक्षीमित्र अश्विन पाटील, अध्यक्ष व सर्व पदाधिकारी हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर, व्हाईस ऑफ मिडीया संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, साप्ताहिक विंगचे पदाधिकारी सह अनेक प्रतिनिधींचे सहकार्य मिळत असते..त्यात सर्वात जास्त वेबपोर्टल साठी लागणारी डिझाईन, नावीन्यता या संदर्भामध्ये अचूक माहिती व डिझायन लक्ष्मीकांत सोनार करून देऊन अमूल्य सहकार्य करतातं.त्याच्यामुळे कार्यक्रम घेणे शक्य होते.. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष,चिटणीस, संचालक मंडळ, साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजयसिंह पवार सर व वाचनालयाचे कर्मचारी व माझ्या भगिनी सौ.वसुंधरा दशरथ लांडगे व नानासाहेब दशरथ सोमा लांडगे यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमाला असते.
मराठी लाईव्ह न्युज या वेब पोर्टलचे लेख व काही बातम्या तयार करत असतांना व्याकरणातील शुद्धलेखनाबाबत माझी पत्नी तथा मराठी लाईव्ह पोर्टलच्या कार्यकारी संपादिका ज्योती ईश्वर महाजन यांचे मला नेहमीच सहकार्य लाभते…
‘मराठी लाईव्ह न्युज वेब पोर्टल’ च्या या प्रवासात वाचकांचा देखील तेवढाच प्रतिसाद आणि सहकार्य लाभते. त्याबद्दल समस्त वाचक वर्गाचे देखील आभार..

✍🏻 शरद भिका पाटील
तालुका सचिव, खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, शाखा-अमळनेर
उपशिक्षक, विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यु.कॉलेज, अमळनेर
भ्रमणध्वनी :- 9595952328

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *