चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित निवासी शाळेत पालक मेळावा संपन्न,संस्थेचे अध्यक्ष डॉ योगेश महाजन यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळसह भेटवस्तू वाटप
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित निवासी शाळेत पालक मेळावा संपन्न..
संस्थेचे अध्यक्ष डॉ योगेश महाजन यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळसह भेटवस्तू वाटप
अमळनेर प्रतिनिधी
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत 26 ऑक्टोबर 2024 रोजी एक विशेष पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या मंचावर पालक सभेचे अध्यक्ष श्री. संजय पाटील, श्री. हेमंत माळी, सौ. किरनकौर शिकलकर, सौ. सुवर्णा संदिप चौधरी, संस्थेचे अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन, कु. मंजुश्री योगेश महाजन, कु. आंचल योगेश महाजन, आणि शाळेचे मुख्याध्यापक मनिष किसन जाधव उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी उपस्थित पालक सभेचे अध्यक्ष आणि पालक प्रतिनिधींना डॉ. योगेश महाजन सर, मंजुश्री महाजन, व आंचल महाजन यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आले. पालकांना मार्गदर्शन, दिशा अभ्यासक्रम, आणि संबंधित माहिती हेमंत महाजन सर व जगदीश सोनवणे सर यांनी दिली.
दिपावलीच्या निमित्ताने, संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन सरांकडून सर्व विशेष विद्यार्थ्यांना फराळ, मिठाई, फटाके, व भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमोर त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन, नृत्य, आणि गीत गायन सादर करून उपस्थितांनी कौतुक केले..

सूत्रसंचालन जगदीश सोनवणे सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन हेमंत महाजन सर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, ज्याने या मेळाव्यातील आनंद वाढवला.
यावेळी अंतर्मुख करणाऱ्या अनुभवांचा आदानप्रदान झाले, आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी सर्व सहभागी व्यक्तींनी एकत्र येत सकारात्मक व सहकार्य भावना प्रकट केली.

