चंद्रकांत भंडारी यांच्या “सिंगल बाय चॉइस” कादंबरीचे प्रकाशन
![]()
चंद्रकांत भंडारी यांच्या “सिंगल बाय चॉइस” कादंबरीचे प्रकाशन
जळगाव प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सुप्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ञ चंद्रकांत भंडारी यांची “सिंगल बाय चॉइस” ही कादंबरी आज जळगाव येथे प्रकाशीत करण्यात आली. ही कादंबरी शिक्षणक्षेत्रातील ध्येयवादी शिक्षक नायकाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशील सर्वांगीण शिक्षणाची साक्ष देणारी चिंतनशील काम आहे.
या प्रकाशनाचे शुभारंभ प्रा. डॉ. भा. पं. सावखेडकर यांचे शुभहस्ते झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शशिकांत हिंगोणेकर, पूर्व विभागीय सचिव, लातूर बोर्ड यांनी भूषवले. प्रमुख उपस्थितीत प्राईमचे प्रकाशक प्रदीप पाटील देखील होते.

या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात शहरातील शिक्षणप्रेमी मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी विचार बदलणाऱ्या या कादंबरीच्या उपयुक्ततेवर चर्चा केली. “सिंगल बाय चॉइस” शिक्षण क्षेत्रातील नवीन विचारधारा आणि दृष्टिकोन प्रस्तुत करते, जे शिक्षणतज्ञांचे कार्य अधिक प्रभावी बनवण्यास मदत करेल.
हा समारंभ शिक्षण क्षेत्रातील ओरखडे उघडणारा, संशोधनाच्या नोंदी ठेवणारा आणि नवा विचार सादर करणारा असा ठरला.

