डॉ. बाबासाहेब आंबेडकर: प्रज्ञा, शिल, करुणेचा महासागर..! शारदीय व्याख्यानमालेत एडवोकेट आशिष जाधव यांचे प्रतिपादन
![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: प्रज्ञा, शिल, करुणेचा महासागर..!
शारदीय व्याख्यानमालेत
एडवोकेट आशिष जाधव यांचे प्रतिपादनशारदीय व्याख्यानमालेत
भारतीय संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर झाली चर्चा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
देशाचा कारभार व्यवस्थितपणे व्हावा यासाठी काही नियमांची गरज असते, हे नियम एका विशिष्ट पुस्तकात समाविष्ट केले जातात, नियमांच्या या पुस्तकालाच ‘राज्यघटना’ किंवा ‘संविधान’ असे म्हणतात.भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. असे मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा.आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफतवाचनालय,अमळनेरतर्फे दि.४ऑक्टोबरला शारदीय व्याख्यानमालेत व्याख्याते एडवोकेट आशिष जाधव जेष्ठविधीतज्ञ संभाजीनगर बोलत होते..
ते पुढे म्हणाले की यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार होते..”संविधान हे केवळ वकिलांचे दस्तऐवज नाही, ते जीवनाचे वाहन आहे आणि त्याचा आत्मा हा नेहमीच युगाचा आत्मा असतो.” “महान माणूस एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो.” असे सांगत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या संदर्भात सविस्तर माहिती व त्यांची सर्व कलमे या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा व्याख्याते एडवोकेट अविनाश जाधव यांनी केली.
तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एडवोकेट श्रावण ब्राम्हे,विलास शिंदे सह
व्यासपीठावर मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी,संचालक
प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, सौ वसुंधरा लांडगे होते.पाहूण्याचा परीचय प्रा.शिला पाटील यांनी केला.यावेळी प्रमुख पाहुण्यांचा व यावेळी विशेष सत्कार प्रा.तुंटे यांचा सत्कार करण्यात आला..यावेळी देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आनंद उत्सव साजरा करण्यात आला…

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी म्हणाले कि
मराठी राजभाषा व्हावी या प्रयत्नांना आज यश आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केद्र सरकाराचे मंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, व सर्व मंत्री यांचे विशेष अभिनंदन करतो. यावेळी श्रोत्यांसह मान्यवर यांनी टाळया वाजवल्या व आनंद व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे अँड श्रावण ब्रम्हे,प्रा.तुंटे यांनी म्हटले कि
शासन आणि जनता किंवा नागरिक याच्यातला एक सुसंवाद म्हणजे भारताचा संविधान होय असे सांगितले..

व्याख्यान मालीका यशस्वी करण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ
सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे,
कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी
सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल
भागवत, स्नेहा एकतारे, संदीप
घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब
मगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम
पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत
सदस्य अजय केले, बजरंगलाल
अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे यांनी
केले आहे.
सुत्रसंचालन मराठी वाड्:मय मंडळाच्या संचालिका प्रा.शिला पाटील, व कार्यवाह नरेंद्र निकुंभ यांनी केले.तर आभार प्रा.शिला पाटील यांनी मानले..

