डॉक्टरांचा गोड स्वभाव आणि सहानुभूतीही रुग्णांना मानसिक आधार देते- ज्येष्ठ पत्रकार जी.टी टाक , घटस्थापने च्या शुभमुहूर्तावर’ गुरुकृपा क्लिनिक’ चे कळमसरे येथे उद्घाटन
1 min read

डॉक्टरांचा गोड स्वभाव आणि सहानुभूतीही रुग्णांना मानसिक आधार देते- ज्येष्ठ पत्रकार जी.टी टाक , घटस्थापने च्या शुभमुहूर्तावर’ गुरुकृपा क्लिनिक’ चे कळमसरे येथे उद्घाटन

Loading

डॉक्टरांचा गोड स्वभाव आणि सहानुभूतीही रुग्णांना मानसिक आधार देते- ज्येष्ठ पत्रकार जी.टी टाक

घटस्थापने च्या शुभमुहूर्तावर’ गुरुकृपा क्लिनिक’ चे कळमसरे येथे उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी
डॉ म्हणजे जीवनदान देणारे, संकटाच्या काळात आशेचा किरण असणारे, आणि कधी कधी तर देवाच्या रूपात उद्धरलेले व्यक्तिमत्त्व. “डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हटले जाते” कोविड महामारीच्या काळात डॉक्टरांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही.डॉक्टरांचा गोड स्वभाव आणि सहानुभूतीही रुग्णांना मानसिक आधार देते. अनेक वेळा, रुग्णांचे आजारपण कमी करण्याच्या यशात डॉक्टरांचे वर्तन आणि संवाद महत्त्वाचा वाटा असतो. डॉ कपिल महाजन याला खरे उतरतील असे कळमसरे येथे घटक स्थापनेच्या शुभमुहूर्तावर’ गुरुकृपा क्लिनिक’ चे कळमसरे येथे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार तथा माजी सरपंच जी.टी. टाक यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले
दवाखान्याचे उद्घाटन परमपूज्य रतन बाबा जैन(मौनी बाबा) व डॉ मोतीलाल महाजन,सौ विणा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जगदीश निकम,उपसरपंच जितेंद्र राजपूत, पत्रकार बाबुलाल पाटील, ईश्वर महाजन, प्रा. हिरालाल पाटील, गजानन पाटील,वसंतराव पाटील, स्वप्निल पाटील ,पोलीस पाटील गोपाल माळी होते.
यावेळी पत्रकार प्रा हिरालाल पाटील, पत्रकार ईश्वर महाजन यांनी सांगितले कि आजतागायत कळमसरे गावात डॉ कै वामन महाजन, कै.डॉ सतीश सोनवणे, सुधाकर नेमाडे,डॉ मोतीलाल महाजन, यांची वैद्यकीय क्षेत्रातील परंपरा अभिमानस्पद पद आहे…

डॉ कपिल महाजन यांचे वडील डॉ मोतीलाल महाजन यांनी 1983 पासून आपल्या गाव परिसरात वैद्यकीय सेवेला सुरुवात केली होती.. या वैद्यकीय सेवेला पुढे घेऊन जाण्यासाठी गाव आणि परिसराची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ऋणात्मक उतराई व्हावी म्हणून डॉ कपिल महाजन यांनी गुरुकृपा क्लिनिकच्या माध्यमातून वडिलांचे वैद्यकीय सेवेचा विस्तार करण्यासाठी 3 ऑक्टोबर गुरुवारी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर एक क्लिनिक सुरू केले.. निश्चितच ग्रामीण भागातील गोरगरीब तळागाळातल्या पेशंटसाठी महत्त्वाचे ठरेल असे सांगितले..

यावेळी कळमसरे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, आजी-माजी सदस्य ,विकास सोसायटीचे चेअरमन, सर्व आजी-माजी सदस्य, समाज बांधव व सर्व ग्रामस्थ मंडळ, शिक्षण, सामाजिक , क्षेत्रातील सर्वच मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

यावेळी गजानन मेडिकल , अंबिका मेडिकल ,धन्वंतरी मेडिकल , सुरेश निंबा महाजन, संजय तुकाराम चौधरी
यांनी विशेष सहकार्य केले तर ग्राम विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर पाटील डॉ सुधाकर नेमाडे, विजया नेमाडे, डॉ भुषण पाटील, डॉ शुभांगी पाटील यांनी केले..

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल महाजन,ममता महाजन, डॉ कपिल महाजन, योगिता महाजन सहसमाज बांधव यांनी प्रयत्न केले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *