शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करा- सहाय्यक आयुक्त योगेश पाटील
![]()
शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करा-
सहाय्यक आयुक्त योगेश पाटील
आपल्या संपूर्ण जीवनात ज्ञानाला अधिक महत्त्व असून पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे मौलिक आणि जीवनाची यशस्वी करणारे असते पुस्तके माणसाचे भविष्य ठरवत असतात आणि म्हणूनच परिस्थितीचे भान ठेवून काळाची गरज ओळखून शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करण्याची खरी गरज असल्याचे मत सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त व्याख्यानमालेत दुसरे पुष्पगुंपताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी यशस्वी जीवनाचे मार्ग या विषयावर बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दहावी ब ची विद्यार्थिनी प्रज्ञा कापडणे होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. हेमांगी पाटील हिने केले. भूपाळी धनश्री शिंपी, ईशस्तवन खुशी बिऱ्हाडे, प्रीती माळी व इतर विद्यार्थिनींनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस. के.राणे राजपूत यांनी करून दिला.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी आपल्या मनोगतात यशाची गुरुकिल्ली शालेय जीवनातच असून आपल्या शिक्षकांप्रती असणारा आदरयुक्त भाव ज्ञानाप्रती असणारे आत्मभान आपल्याला पुढे नेणारे असते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पूजा कुंभार हिने केले. आभार चेतन चौधरी याने मानले. विचार मंचावर पर्यवेक्षक एल.जे.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.डी. कचरे व भावना चौधरी उपस्थित होते.

