२३ सप्टेंबरपासून कृती समिती व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण, २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन, मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार
1 min read

२३ सप्टेंबरपासून कृती समिती व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण, २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन, मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार

Loading

२३ सप्टेंबरपासून कृती समिती व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख नेत्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण,

२५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन,
मानधन वाढ,

ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार

मुंगसे , ता अमळनेर दि२० (वार्ताहर )
२३ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण व २५ सप्टेंबर रोजी तीव्र निदर्शने करून जेल भरो आंदोलन करण्याबाबत शासनाला नोटीस देऊनही प्रलंबित मागण्या मान्य करून शासकीय आदेश काढण्यासाठी शासनाकडून कोणत्याही हालचाली घडून आलेल्या नाहीत. शासकीय स्तरावर एकही बैठक या दरम्यान घेण्यात आलेली नाही. यावरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या सर्व योजना यशस्वी रित्या राबवून घेणारे शासन प्रत्यक्ष त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत किती उदासीन आहे हे लक्षात येते. त्यामुळे तीव्र लढा करण्याचा कृती समितीचा निर्धार अजूनच पक्का झाला आहे. हे आंदोलन होणार आणि त्यात अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार हे निश्चित आहे.

२३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची सुरवात होईल. सर्व ७ घटक संघटनांचे २५ मोजके नेते या बेमुदत उपोषणात सहभागी होतील. त्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज सुमारे १५० अंगणवाडी कर्मचारी २४ तासांच्या साखळी उपोषणाला बसतील. रोज ११ वाजता एका बॅचचे उपोषण संपवून त्या नंतरच्या बॅचचे उपोषण सुरू करण्यात येईल. बेमुदत व साखळी उपोषणकर्त्यांनी आझाद मैदानावर मुक्काम करण्याच्या तयारीने सर्व आवश्यक त्या गोष्टी सोबत घेऊन यावे. कुणीही मौल्यवान दागिने घालून येऊ नये. उपोषणाला बसणाऱ्या महिलांनी २० तारखेपर्यंत आपले नाव, वय आदी तपशील आपापल्या संघटनेला द्यावा. त्यांनी शक्यतो २२ तारखेला रात्री किंवा २३च्या सकाळी लवकर मुंबईत पोहोचावे. त्यांनी येताना आधारकार्ड, एक छोटी सतरंजी, पांघरूण, औषधे, पाण्याची बाटली इत्यादी साहित्य घेवून यावे.

२५ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान, मुंबई येथे जेल भरो आंदोलनात सहभागी होण्यासाठी येतील.या दिवशी मुंबई सहित सर्व जिल्ह्यांमध्ये अंगणवाड्या बंद राहतील. आहार, पोषण ट्रॅकर, ऑनलाईन काम, अन्य योजनांचे कामकाज आदी कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत. याची नोटीस आजच कृती समिती शासनाला पाठवणार आहे. शासनाने व प्रशासनाने याची नोंद घ्यावी. या नोटीसची प्रत सर्व जिल्हा परिषदा, विभागीय उप आयुक्त व प्रकल्प कार्यालयांना देण्यात यावी. जेल भरो आंदोलन १२ वाजता सुरू होईल त्यामुळे सर्वांनी ११ वाजता आझाद मैदानावर उपस्थित रहावे अशी सूचना कृती समिती करत आहे.

एकच नारा, जीआर काढा!
हमारी कृती समिती, हमारी ताकद!!

एम ए पाटील, शुभा शमीम
दिलीप उटाणे,कमल परुळेकर
भगवानराव देशमुख,जीवन सुरुडे जयश्री पाटील भानुदास पाटील संघटक सचिव महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांन्वये कळविलेले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *