प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे क्रीडा शिबिर सुरु
![]()
प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे क्रीडा शिबिर सुरु
———————————————
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा आयोजित विविध खेळांच्या क्रीडा शिबिराचे उदघाटन आज दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी खा.शि.मंडळाचे संचालक श्री.प्रदीप भाऊ अग्रवाल यांनी केले व खेळाडूंना शुभेच्छा देऊन खेळाडू वृत्तीने जिंकणे व हरणे स्वीकारून खेळात सातत्य ठेवावे,असे आवर्जून सांगितले.
प्रस्तुत प्रसंगी जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.संदीप नेरकर यांनी खेळाडू कसा असावा, त्याने आधुनिक काळात कश्या प्रकारे खेळाकडे पहावे या सह अन्य काही मौलिक उदाहरण देऊन खेळाडूंत नवचैतन्य उत्पन्न केले.

महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य
डॉ.अरुण बी जैन सर यांच्या संकल्पनेतून आणि IQAC प्रमुख डॉ. मुकेश भोळे यांच्या मदतीने क्रीडा शिबिरास सुरुवात झाली.उदघाटन प्रसंगी शिबिराचे आयोजक प्रा.डॉ. सचिन पाटील (वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा संचालक), प्रा.अमृत अग्रवाल (कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा संचालक),डॉ.सुनील राजपूत,सॉफ्टबॉल प्रशिक्षक डॉ.देवदत्त पाटील,खो खो खेळाचे प्रशिक्षक श्री.सुनील वाघ, क्रिकेट खेळाचे प्रशिक्षक श्री.संजय पवार, सचिन पवार, व्हॉलिबॉल प्रशिक्षक जयेश मासरे, फुटबॉल प्रशिक्षक अर्शद शेख, कुस्ती प्रशिक्षक प्रवीण जाधव, प्रशांत देवकाते आणि सर्व खेळातील प्राविण्य असणारे खेळाडू मित्र या वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कुस्ती, फुटबॉल, खो खो, सॉफ्टबॉल /बेसबॉल, व्हॉलिबॉल या खेळांचे शिबीर १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान सुरू राहतील,हे शिबीर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता खुले आहे.
महाविद्यालय आणि क्रीडा विभागाची कळकळीची विनंती आहे की,विद्यार्थ्यांनी उपरोक्त विविध खेळात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन क्रीडा संस्कृती जोपासावे असे आवाहन डॉ.सचिन पाटील,प्रा. अमृत अग्रवाल यांनी केले आहे.

