ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन रखडले..
![]()
ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन रखडले
शिंदखेडा तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचारी यांना वेतनासाठी वाट पहावी लागत आहे.पगारा अभावी कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे.किराणा, भाजीपाला व्यापारी किती दिवस उधार देतील त्यांनी देखील उधार देणे बंद केले आहे.शिंदखेडा पंचायत समिती कडुन पगाराची माहिती काल दि.१९/०९/२०२४ रोजी म्हणजे खुपच ऊशीराने गेल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील कर्मचारी याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे
आज दि.२०/०९/२०२4 रोजी शिंदखेडा पंचायत समिती येथे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी पगार व ईतर मागण्या संदर्भात गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात आले.

सदर ठिकाणी कर्मचारी यांच्या लक्षात आले की ग्रामपंचायत कर्मचारी यांची माहिती शिंदखेडा पंचायत समिती कडून धुळे जिल्हा परीषदला लेट पाठवल्या मुळे शिंदखेडा तालुक्यातील कर्मचारी यांचे पगार होण्यास विलंब होत आहे. शिंदखेडा पंचायत समिती कारभारा बाबत ग्राम पंचायत कर्मचारी कर्मचारी कडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे व दोन दिवसात पगार न झाल्यास पुढील आंदोलन त्रीव स्वरुपात पंचायत समिती समोर करण्यात येईल असा ईशारा देखील कर्मचारी वर्गाकडून देण्यात आला.

