अखेर विहीरीत पडलेली गाय सुखरूप बाहेर …..  अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व सत्कार…
1 min read

अखेर विहीरीत पडलेली गाय सुखरूप बाहेर ….. अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व सत्कार…

Loading

अखेर विहीरीत पडलेली गाय सुखरूप बाहेर …..

अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व सत्कार…

अमळनेर प्रतिनिधी
खोल विहीरीत अमळनेरला एक गाई पडली, विहीर आकाराने चिंचोळी आणि खोल असल्याने गाईला आतमध्ये फिरता येत नव्हते. बराच काळ विहरीत अडकून पडल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने गाईला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

गाई सुखरूप असली तरी बराच काळ विहीर असल्याने तिच्या शरिरावर किरकोळ जखम झाली आहे. शिवाय विहीर हालचाल होत नसल्याने गाई काहीकाळ अस्वस्थ देखील झाली होते पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय काल अमळनेर शहरात आला…

सर्वात अगोदर अनिल (बापू पेंटर) यांचे लक्ष गेले व नगरपालीकेचे दिनेश बि-हाडे व मच्छिंद्र चौधरी आणि अग्निशमन दलाच्या सहकार्याने गौमाता सुरक्षित बाहेर काढल्या बद्दल माझ्या परिवाराकडून 501 रुपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. बापू पेंटर चा पण सत्कार केला.
अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांचा व आपल्या मंडळाचे युवा सदस्य श्री.रोहित रविंद्र महाजन यांचा आपल्या श्री साईबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती, मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला…यावेळी मंडळाचे श्री.अनिल महाजन,मा.नगरसेवक बाळकृष्ण महाजन, सौ.लता महाजन,फुलमाळी समाजाचे उपाध्यक्ष दिनेशबापू माळी,अ.भा.समता परीषदेचे अमोल माळी, योगेश महाजन, महेश पाटील, निंबा वाणी, सागर महाजन हे उपस्थित होते.
गाईला जीवनदान मिळाल्यामुळे अग्निशामक दलाचे सर्व कर्मचारी व ज्यांनी याकामी सहकार्य केले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *