पाडळसे धरणाबाबत तिन्ही दादांना जाहीर चर्चेचे आव्हान-प्रा अशोक पवार
![]()
पाडळसे धरणाबाबत तिन्ही दादांना जाहीर चर्चेचे आव्हान-प्रा अशोक पवार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पाडळसे धरणाबाबत बोर्ड लावून, व्हाट्सअप च्या माध्यमातून, पत्रकातून व जाहीर भाषणांमधून खोटी व दिशाभूल करणारी माहिती नागरिकांना देण्यात येत आहे .जनतेला सत्य कळावे यासाठी पाडळसे धरणाबाबत श्री साहेबराव, शिरीष व अनिल दादांना जाहीर चर्चेचे आव्हान प्रा अशोक पवार यांनी दिले आहे.


चर्चेची तारीख, वेळ व ठिकाण सांगा असेही त्यांनी नागरी हित दक्षता समितीच्या बैठकीत जाहीर केले. कोणत्याही दादांनी धरणाबाबत फार उल्लेखनीय काम केलेले नाही. सर्वपक्षीय दबाव निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही .धरणाचे गाजर दाखवून येत्या विधानसभा निवडणुकीत मते मिळविण्याचा प्रयत्न करू नका. जनतेला सत्य सांगा एवढीच माफक अपेक्षा जनतेची आहे. अजून 15 ते 20 वर्षे पाडळसे धरण होणार नाही असेही प्रा.अशोक पवार यांनी बैठकीत बोलताना सांगितले.

