मारवड महाविद्यालयातील प्रा. डॉ. जितेंद्र माळी व प्रा. डॉ. पवन पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित
1 min read

मारवड महाविद्यालयातील प्रा. डॉ. जितेंद्र माळी व प्रा. डॉ. पवन पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित

Loading

मारवड महाविद्यालयातील प्रा. डॉ. जितेंद्र माळी व प्रा. डॉ. पवन पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी
मारवड, ता. अमळनेर. येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी व इंग्रजी विभागप्रमुख प्रा. ‌डॉ. पवन चुडामण पाटील यांना नुकताच “भारत सरकारच्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम” तर्फे “भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्कार” देवून गौरविण्यात आले.

 

सदर पुरस्कार शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी धुळ्याच्या आप्पासो. डी. डी. विसपुते शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्री. गोरख देवरे, (राष्ट्रीय अध्यक्ष – नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम), फोरमचे सचिव प्रा. प्रमोद पाटील, संस्थाध्यक्ष मा. नानासो. महेंद्रजी विसपुते, संस्थेच्या सचिव ताईसो. स्मिता विसपुते, शिक्षणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. साहेबराव भुकन, प्राचार्या डॉ. मिना कुंटे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मिनाक्षी महाले, शिक्षणतज्ज्ञ मा. श्री. बालाजी जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. जितेंद्र माळी व डॉ. पवन पाटील यांनी मिळविलेल्या राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्कार बद्दल संस्थाध्यक्ष मा. आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष मा. आबासो. देविदास शामराव पाटील, सचिव मा. आबाजी देविदास बारकू पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले व सर्व प्राध्यापक – प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *