डोंबिवली येथे शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न.
![]()
डोंबिवली येथे शालेय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न.
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण क्रीडा व साबरी विभाग शासनाच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 2024 /25 स्पर्धांची सूरवात डोंबिवली येथील सावराम क्रीडा संकुल येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांचा हस्ते टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे, नेरूरकर कॉलेजचे प्राचार्य व्ही एस पाटील, कल्याण डोंबिवली क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त श्री अंकुर आहेर, क्रीडा संघटक श्री कृष्णा बनगर, मुख्याध्यापक श्री महादेव क्षीरसागर, स्पर्धा नियोजक श्री कृष्णा माळी यांच्यासह खेळ प्रमुख प्राध्यापक अनंत उतेकर यांच्या उपस्थितीत टेबल टेनिस स्पर्धेला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली.
या स्पर्धेचे पंच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त श्रुती जोशी, यांनी खेळ प्रमुख प्रा. चिंतामण पाटील व प्रा. अनंत उत्तेकर यांच्या नियोजनाखाली अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन करत स्पर्धा सुरळीत पार पाडल्या.

आंतरशालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत14, 17 19 या वयोगटातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये अंडर १४ मुली वयोगटात महावीर जैन स्कूल कल्याण ( प्रथम क्रमांक), ट्री हाऊस स्कूल कल्याण ( द्वितीय क्रमांक), चंद्रकांत पाटकर स्कूल डोंबिवली, (तृतीय क्रमांक),तर वैयक्तिक निवड चाचणी मध्ये अरे गुरुकुल स्कूलची कु.अनन्या अमोल रानडे प्रथम क्रमांक पटकावला,ब्लॉसम स्कूल ची कु. अस्मी टोनकर ही दुसऱ्या स्थानी आहे.आणि आर्या गुरुकुल ची स्पृहा सोमेन ही तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच अंडर १७ मुली वयोगटात , महावीर स्कूल कल्याण प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले, द्वितीय क्रमांक वर बीके बिर्ला स्कूल संघाने बाजी मारली व शंकरा विद्यालय डोंबिवलीचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.निवड चाचणी मध्ये अनुक्रमे बिके बिर्ला स्कूलची काव्यांजली वाघ (प्रथम), विद्यानिकेतन स्कूल ची सीमा थोरात व राही प्रभुणे यांनी दुसऱ्या तिसरा क्रमांक पटकावला.अंडर १९ वयोगट मुलींमध्ये बिर्ला कॉलेज संघाने दुसरा क्रमांक मिळवला तर के. व्ही.पेंढारकर कॉलेज चा संघाने प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे. निवड चाचणी मध्ये कुमारी ऋतुजा चिंचनसुरे, व साक्षी पाटील यांची निवड झाली आहे.
त्याचप्रमाणे दुपारी मुलांच्या ही स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये १४ वयोगटात महावीर जैन इंग्लिश स्कूल कल्याण- प्रथम क्रमांक, ट्री हाऊस स्कूल कल्याण- व्दितीय क्रमांक, बी के बिर्ला स्कूल-तृतीय क्रमांकवर आहे.अंडर १७ वयोगटात ओमकार स्कूल आय सी ई डोंबिवली – प्रथम क्रमांक, लोढा वर्ल्ड स्कूल- द्वीतीय क्रमांक, पेंढारकर कॉलेज-तृतीय क्रमांक,अंडर १९ मध्ये , प्रथम क्रमांकावर बी के कॉलेजने बाजी मारली, मॉडेल कॉलेजने द्वीतीय क्रमांक पटकावला तर पेंढारकर कॉलेज तृतीय स्थानावर आहे. निवड चाचणी मधे अंडर १४ चे मंदार राणे- सिस्टर निवेदिता स्कूल, मयंक बंदरकर-ओमकार स्कूल,व डर्प नायडू- पोतदार स्कूल यांची निवड झाली. तसेच अंडर १७ मध्ये दर्शिल खंबायत- बीके बिर्ला स्कूल, आयुष साठे -ओक हायस्कूल कल्याण, व ध्रुव कोडली- बीके बिर्ला स्कूल याप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत टेबल टेनिस खेळापासून अत्यंत उत्साहात आणि आनंदात स्पर्धेला सुरुवात झाली आहे व टेबल टेनिस स्पर्धा सर्व क्रीडा संघटक क्रीडा संयोजक व खेळाडू यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे साहेब यांच्यासह खेळ प्रमुख प्रा अनंत उतेकर व प्रा चिंतामण पाटील यांच्यासह टेबल टेनिस पंच राजेश देशपांडे व श्रुती जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

