14 सप्टेंबरला अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाचा उपक्रम, तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन ,14 वर्षापासून मंडळाचा निरंतर उपक्रम सुरू- तालुका अध्यक्ष आशिष शिंदे यांची माहिती
![]()
14 सप्टेंबरला अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाचा उपक्रम,
तालुकास्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन
14 वर्षापासून निरंतर उपक्रम सुरू- तालुका अध्यक्ष आशिष शिंदे यांची माहिती
अमळनेर प्रतिनिधी- दरवर्षी 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस हिंदी निमित्ताने हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.. त्यात तालुक्यातील हजारो विद्यार्थी सहभागी होतात.. हा उपक्रम गेल्या 14 वर्षापासून अमळनेर तालुक्यातील हिंदी अध्यापक मंडळ राबवित आहेत..

हिंदी अध्यापक मंडळाला अगोदर बँक ऑफ महाराष्ट्र व सध्या गेल्या अनेक वर्षापासून शहादा येथील युनियन बँक प्रबंधक मयूरजी पाटील यांचे मोठे योगदान लाभत आहे.. त्यांच्या सहकार्यातून तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांना बक्षिसे, उपक्रमशिल शिक्षक यांचा सन्मान, असे उपक्रम राबवले जातात..सेवानिवृत्त शिक्षकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते…
मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष दीपक पवार व संचालक मंडळ यांनी मंडळाच्या कामाला योग्य दिशा दिली तर वर्तमान अध्यक्ष आशिष शिंदे व पदाधिकारी प्रामाणिकपणे मंडळाचे काम करीत आहेत.. मंडळ हिंदी विषयाचे महत्त्व विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत..

*14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्ताने 5 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सामान्य ज्ञान परीक्षांमध्ये सहभागी होतील-आशिष शिंदे तालुकाध्यक्ष हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर*
14 सप्टेंबर 2024 हिंदी दिनानिमित्ताने तालुका स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत तालुक्यातून 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतील त्यासाठी तालुक्यातील सर्व हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी मेहनत घेत आहेत त्यासाठी नुकतीच बैठक झाली.. स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे पाचवी ते सातवी ग्रामीण व शहरी गट व आठवी ते दहावी ग्रामीण व शहरी गट असे दोन गट करण्यात आले आहेत.. परीक्षाही 50 गुणांची आहे प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे . दोन्ही गटातून विजेता एक ते पाच क्रमांक व सहा ,सात, आठ क्रमांकाचे पारितोषिक लकी ड्रॉ पद्धतीने काढले जाईल.. 75 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणारे शाळेतील राष्ट्रभाषा हिंदी विषय शिक्षकांना कृतिशील राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक पुरस्कार 2024 म्हणून सन्मान चिन्ह किंवा भेटवस्तू देऊन गौरविले जाणार आहे.. व स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे…
*प्रश्नपत्रिका निर्मितीचे यांनी काम पाहिले..*
शहरी क्षेत्र गट – श्री प्रदीप चौधरी ,श्रीमती सावे मॅडम, ग्रामीण क्षेत्र गट- डॉ. किरण निकम, श्रीमती योगश्री पाटील मॅडम यांनी काम पाहिले..
*हिंदी अध्यापक मंडळाचे खालील पदाधिकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेत आहेत मेहनत*
हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.एन आर.चौधरी,आशिष शिंदे अध्यक्ष,ज्ञानेश्वर इन्सुलकर उपाध्यक्ष,दिलीप पाटील सचिव, मार्गदर्शक दिपक पवार (माजी अध्यक्ष), मार्गदर्शक सोपान भवरे,
राजेंद्र पाटील कोषाध्यक्ष, परीक्षा समिती सदस्य कमलाकर संदानशिव, प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन,सदस्य
प्रदीप चौधरी,मुनाफ तडवी, डॉ.किरण निकम,श्रीमती मंगला चव्हाण,श्रीमती जाधव,श्री.प्रशांत वंजारी,श्रीमती योगश्री पाटील,श्रीमती कविता मनोरे, श्रीमती सावे,सुनील पाटील सह पदाधिकारी घेत आहे…

