अमळनेरला संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्ताने पारायण विविध कार्यक्रम संपन्न…
1 min read

अमळनेरला संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्ताने पारायण विविध कार्यक्रम संपन्न…

Loading

अमळनेरला संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्ताने पारायण विविध कार्यक्रम संपन्न…

अमळनेर प्रतिनिधी-

महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांची ०८ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते..अमळनेर येथील दादासाहेब जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा गजानन महाराजांचे लाखो भक्त आहेत.
गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमी दिवशी शेगाव येथे समाधी घेतली. म्हणून ऋषिपंचमी दिवशी त्यांच्या समाधीस्थळावर दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. गजानन महाराजांचे भक्त या दिवशी लाखो लाखोच्या संख्येने शेगाव येथे गजानन महाराजांचे भक्त जमा होतात. व पुण्यतिथी हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सकाळी गजानन महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला जातो. तसेच पालखीची मिरवणूक देखील काढले जाते.
अमळनेरला संत गजानन महाराज मंदिरात सकाळी महाआरती व रूद्र अभिषेक करण्यात आले.

गजानन महाराज भक्त महिलांनी सामूहिक पारायण केले.. विजय ग्रंथाचे वाचन महिला वारी प्रमुख ज्योतीताई पवार यांनी केले.. यावेळी गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा. आर.बी पवार,अशोक भावे महाराज,नितीन भावे महाराज, सेवेकरी रघूनाथ पाटील
ह.भ.प.पुंडलीक पाटील कळमसरे
सह आणि गजानन महिला व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

आज गजानन महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने अमळनेर तालुक्यातील अनेक भाविकांनी महाराजांचे दर्शन व प्रसाद घेतला व आशीर्वाद घेतला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *