शिक्षणदिप या शैक्षणिक ई – मासिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…
![]()
शिक्षणदिप या शैक्षणिक ई – मासिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…
जळगाव: महावाचन चळवळीचा एक भाग म्हणून वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी शिक्षकमंच जळगाव संचलित, शिक्षणदिप या शैक्षणिक मासिकाचे 5 सप्टेंबर, शिक्षक दिनानिमित्त राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. गिरीषभाऊ महाजन तसेच खासदार स्मिताताई वाघ, आमदार लताताई सोनवणे, कलेक्टर मा.आयुष प्रसाद साहेब, CEO डॉ. अंकित साहेब, डाएट प्राचार्य मा.अनिल झोपे साहेब, शिक्षणाधिकारी मा. विकास पाटील साहेब, मा. मच्छिंद्र निकम, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी,शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हक्काचे एकमेव डिजिटल ई- मासिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ या डिजिटल मासिकाद्वारे मिळणार आहे. मासिकात वेगवेगळ्या प्रकारची वाचनीय सदरे समाविष्ट असून, नवोपक्रमशील शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा मासिकाच्या माध्यमातून इतर शाळांना लाभ होईल. तसेच अनेक विद्यार्थी, शिक्षक कवी, लेखक म्हणून उदयास येतील. जिल्ह्याच्या वाचन संस्कृतीला समृद्ध करणारा शिक्षणदिप या मासिकाचा अंक दर महिन्याला डिजिटल स्वरूपात प्रकाशित होणार असून सर्वांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाईल जळगाव या मासिकाठी जिल्ह्यातील शाळा शिक्षक व विद्यार्थ्यांना स्वनिर्मित साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मासिकाच्या निर्मितीसाठी शिक्षकमंच जळगांव ग्रुपचे सदस्य शिक्षक संदिप सोनार, सुनील बडगुजर, राहुल चौधरी, संभाजी हावडे, प्रभात तडवी, मनोहर तेजवाणी, भूषण महाले व शिक्षक मित्र, तालुका प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

