खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे ‘एक पेड मा के नाम’ उपक्रम संपन्न
![]()
खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एक पेड मा के नाम या उपक्रम आयोजन
जळगांव प्रतिनिधी
खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे एक पेड मा के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार सुरेश भोळे,सौ.उज्ज्वलाताई बेंडाळे माजी नगरसेविका,सौ.गायत्री राणे.माजी नगरसेविका,श्री.अजित राणे मा.प्राचार्य श्री.अशोक राणे के.सी.ई.सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक मा.श्री.शशिकांत वडोदकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.प्रणिता झांबरे,पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे व्यासपीठावर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.
सदर कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली
याप्रसंगी मा.आ.सुरेश भोळे यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड मा के नाम या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व पालकांनी ,शिक्षकांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यात यावी व पर्यावरण समतोल राखून व शेतकऱ्यांवर येणारे नैसर्गिक संकट आपण दूर करण्यात हातभार लावावा. व सामाजिक दायित्व पार पाडावे.तसेच विद्यार्थ्यांना गणपती प्रदक्षिणाची गोष्ट सांगत आपल्या आयुष्यात आई वडील व शिक्षक यांचे स्थान महत्त्वाचे आहेत. व सर्वाना गणेशोत्सवनिमीत्त शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष भेट देऊन संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.शाळेत मान्यवरांकडून वृक्ष लागवड करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रणिता झांबरे यांनी केले.सूत्रसंचालन श्री.चंद्रकांत कोळी सर व आभार प्रदर्शन श्री.नरेंद्र पालवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.डि.ए.पाटील, श्री.आर.एन.तडवी,श्री.वेदप्रकाशआर्य, श्री.विवेक मोरे,श्री.पराग राणे,श्री.चेतन सोनार, सौ.सुचिता बाविस्कर, सौ.रोशनी कोळी,सौ.हेमलता भोळे,सौ.प्रीती रडे,श्री.प्रविण महाजन, श्री.चंदन खरे,श्री.अनिल शिवदे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी
परिश्रम घेतले.

