मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे उत्साहात साजरा*
![]()
*मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे उत्साहात साजरा*
अमळनेर प्रतिनिधी
मराठा सेवा संघ या पुरोगामी, वैचारिक व सामाजिक संघटनेची स्थापना १ सप्टेंबर १९९० रोजी युग पुरुष पुरूषोत्तम खेडेकर यांनी केली. मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन अमळनेर येथे यशवंत हॉल, धनदायी महाविद्यालय येथे प्रा.अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील, गटविकास अधिकारी सुशांत पाटील,प्रा.बी.ए.पाटील, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील प्रा.डॉ.लिलाधर पाटील,डॉ.उज्वला विलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.प्रास्ताविक अध्यक्ष रामेश्वर भदाणे यांनी तर सूत्रसंचालन सचिव प्रेमराज पवार यांनी केले व आभार कार्याध्यक्ष अशोक पाटील यांनी मानले.कार्यक्रमास शहराध्यक्ष डॉ.कुणाल पवार, जिजाऊ ब्रिगेड च्या वैशाली शेवाळे,नुतन पाटील, मराठा सेवा संघाचे सदस्य,शसंदीप खैरनार निंबाजी पाटील, महेश पाटील, उज्वल पाटील,दिपक काटे, नंदलाल पाटील, भाऊसाहेब पाटील,विजय पाटील, हेमंत अहीरराव सर,सोनवणे सर उपस्थित होते.

