जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील टिमचे अमळनेर तालुक्यातील पाच गावांना मुल्यांकन भेट
1 min read

जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील टिमचे अमळनेर तालुक्यातील पाच गावांना मुल्यांकन भेट

Loading

जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील टिमचे अमळनेर तालुक्यातील पाच गावांना मुल्यांकन भेट

अमळनेर प्रतिनिधी
मा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर (केआरसी ) यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात केआरसी म्हणून जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत मधुन सरपंच ,ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर , बचत गट प्रतिनिधी , जलसुरक्षक यांना राष्ट्रविकास संस्थे मार्फत प्रशिक्षण देण्यात आले त्या संदर्भात राज्यातील टिम जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाच ग्रामपंचायत त्या मध्ये शिरुड , निसर्डी , दहिवद खु ( औरंगपुर),पिंगळवाडे , खेडी प्र ज या गावात भेटी दिल्या या प्रसंगी राज्याच्या टिम मध्ये श्री अरुण रसाळ , श्री शेख साहेब , श्री मनोहर सोनवणे क्षमता बांधणी तंज्ञ जिल्हा परिषद जळगाव , श्री मोरे साहेब , श्री काबळे साहेब बीआरसी पंचायत समिती अमळनेर सदर टिम सोबत होते. या दरम्यान सर्व जल जीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्ह्यातील अधिकारी यांचे सहकार्य मिळत आहे
*सदर प्रसंगी सुरुवातीला जिल्हा परिषद जळगाव येथे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.अतुल पाटील , जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेचे प्रमुख मा.श्री.देशपांडे साहेब , श्री दिपक राजपूत , भदाणे बापु , पाणी पुरवठा जिल्हा अधिकारी तसेच येथील सर्व जल जीवन मिशन अंतर्गत सर्व जिल्ह्या अधिकारी यांच्या सोबत जळगाव जिल्हा परिषद येथे मिटींग घेण्यात आली त्या नंतर दुसर्या दिवसापासून सदर ग्रामपंचायतीला भेटी दिल्या त्या प्रसंगी प्रशिक्षण कसे झाले , प्रशिक्षण घेऊन आल्यावर आपण गावात काय केले , गावात पाणी तपासणी किट आहे त्या किटचा वापर कसा केला जात आहे , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे , जल जीवन मिशन अंतर्गत स्किम मध्ये कोणती कामे करण्यात येणार आहे , तसेच राष्ट्रविकास संस्थे मार्फत प्रशिक्षण देण्यात आलेले काही प्रतिनिधी यांचे वैयक्तिक मुलाखत घेऊन फार्म देखील भरण्यात आले, गावातील काही कुटुंबाचा सर्वेक्षण देखील करण्यात आले,गावातील नळ व्यवस्था कशी आहे ते देखील पहाणी करण्यात आली, या पासून महिला यांना काय फायदा झाला हे देखील विचारणा केली तसेच पुढील काळात काय नियोजन आहे हि देखील चर्चा करण्यात आली व प्रशिक्षण मध्ये देण्यात आलेले किट या विषयावर देखील सखोल चर्चा केली तसेच पुढील प्रशिक्षण कार्यक्रम घेतांना आजुन काही बद्दल केला पाहिजे का हे देखील प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी यांना विचारणा केली
सदर मुल्यांकन भेट दरम्यान शिरुड , निसर्डी , दहिवद खु , पिंगळवाडे , खेडी येथे सरपंच ,मा.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,मा.ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक , जलसुरक्षक ,आशा वर्कर , बचत गट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका,तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या दरम्यान हजर होते

सदर प्रशिक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव मा.श्री अंकित साहेब, तात्कालिन प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जळगाव मा. श्री भरत कोसोदे सध्या असलेले प्रकल्प संचालक मा.श्री अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भूपेंद्र महाले यांच्या सहकार्याने राष्ट्रविकास संस्थे मार्फत सदर प्रशिक्षण घेण्यात आले राष्ट्रविकास संस्थेचे सचिव श्री. तुषार पाटील या दरम्यान मुल्यांकन भेट नियोजन तसेच संस्थेचे संचालक रागिणी महाले यांच्यासह संस्थेचे प्रतिनिधी नयना चौधरी,महेश माकडे, सुशिल केदारे ,किशोर बागुल, दिलीप पाटील, स्वप्नील पाटील, सीमा महाजन, अमोल सुर्यवंशी,गणेश राजपूत ,नितेश चव्हाण , राहुल सूर्यवंशी, कुणाल पाटील, भाग्यश्री गोसावी, हिलाल पाटील ,गोरख पाटील, विद्या पाटील, चेतन पाटील,हे सदर मुल्यांकन भेटीचे नियोजन यशस्वीरित्या केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *