अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न…
![]()
अमळनेर हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न…
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील हिंदी अध्यापक मंडळाची सविचार सभा नुकतीच संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला नेपाळ मधील दुर्घटनेते मृत पावलेल्या सर्व यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सविचार सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते. या सभेचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर यांनी मांडले. मंडळाचे सचिव दिलीप पाटील व कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मागील वर्षाचा खर्चाबाबत लेखाजोखा सभेत सादर केला गेला. येणाऱ्या हिंदी दिवसाच्या नियोजन विषयी चर्चा झाली. 14 सप्टेंबर ‘हिंदी दिवस’ निमित्त तालुकास्तरीय हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी अमळनेर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा कार्यकारणी सदस्य एन आर चौधरी व मार्गदर्शक दीपक पवार यांनी केले आहे. येत्या काळात हिंदी अध्यापक मंडळात सामाजिक कार्य करण्याची आवड आणि हिंदी भाषा विषयी रुची असलेल्या हिंदी अध्यापकांना मंडळात स्थान दिले जाईल. तसेच ज्या हिंदी अध्यापक बंधू -भगिनी यांना हिंदी अध्यापक मंडळाच्या कार्यात सहभागी व्हायचं असेल त्यांनी संपर्क करावा असे आवाहन हिंदी मंडळ अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केले आहे.
आजच्या सभेत डी आर कन्या विद्यालयाच्या हिंदी अध्यापिका श्रीमती साबे मॅडम यांची हिंदी अध्यापक मंडळाच्या सहयोगी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. श्रीमती प्रतिभा जाधव, श्रीमती साबे मॅडम, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्सुलकर सर , मुख्याध्यापक एन आर चौधरी सर यांचा सत्कार करण्यात आला.
या सभेसाठी जिल्हा कार्यकारणी सदस्य एन आर चौधरी, मार्गदर्शक व माजी अध्यक्ष दीपक पवार , अध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर, सचिव दिलीप पाटील,सहसचिव कमलाकर संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, परीक्षा समिती प्रमुख डॉ. किरण निकम, प्रदीप चौधरी, मुनाफ तडवी, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, कार्यकारी महिला सदस्य श्रीमती वाय आर पाटील, श्रीमती कविता मनोरे, श्रीमती प्रतिभा जाधव, श्रीमती साबे, प्रशांत वंजारी, बापूसाहेब मोरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ किरण निकम यांनी केले व आभार श्रीमती कविता मनोरे मॅडम यांनी व्यक्त केले.


