मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील
1 min read

मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील

Loading

मुलीं आणि आई मधील नाते मैत्रिणी सारखं असले पाहिजे-प्रीती पाटील
असोदा – शालेय जीवनात आपल्या मुलींच्या आयुष्यात अतिशय चांगल्या प्रकारच्या भविष्याच्या दृष्टीने योग्य वाटचाल करावयाची असल्यास कुटुंबात मुलींशी आईने मैत्रिणीसारखी वागण्याची आवश्यकता असून तिच्या सर्वांगीण विकासाकरता कुटुंब हा घटक महत्त्वाचा असल्याचे मत प्रिया पाटील यांनी सार्वजनिक विद्यालयात माता पालक सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले. मुलीं संदर्भात जागरूकता व सुरक्षितता या विषयांतर्गत माता पालक समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल होते. याप्रसंगी सौ. पल्लवी किशोर कोल्हे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.विचार मंचावर सहसचिव सौ.अनिता सतीश डोळसे, कु. तृप्ती दीपक बिऱ्हाडे,सौ. पल्लवी कोल्हे उपस्थित होते या सभेत सौ.हर्षा प्रवीण भोळे, विशाखा विनोद चिरमाडे, सविता रवींद्र कापडणे, गायत्री डीगंबर येवले, दिपाली मनोहर नारखेडे, गीता ललित चौधरी, पल्लवी योगेश पाटील, पूजा सोमनाथ दुर्वे, लतिका सुहास बिऱ्हाडे, वैशाली नरेंद्र भालेराव,जागृती नारखेडे या माता -पालक उपस्थित होत्या.सभेच्या सचिव सौ.शुभांगिनी दिवाकर महाजन यांनी सूत्रसंचालन केले, आभार सौ.वृषाली चौधरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *