*रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण*
![]()
*रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे पदग्रहण*
येथील रावसाहेब रुपचंद विद्यालय जळगाव या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे कार्यकारिणी सदस्यांसह विद्यार्थ्यांची ‘इंटरॅक्ट क्लब’ साठी निवड करण्यात आली.
कार्यक्रमास रोटरीच्या अध्यक्षा रो.छाया पाटील, सेक्रेटरी रो. किरण सिंग, माजी अध्यक्ष रो.आर.एन. कुलकर्णी, प्रा.दिलीप भारंबे, रो. हेमंत पाटील, रो. श्रीरंग पाटील, रावसाहेब रूपचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यू.बी.जाधव, इंटरॅक्ट क्लबचे प्रमुख योगेश चौधरी, उपप्रमुख गिरीश भावसार व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी रोटरीचे माजी अध्यक्ष आर. एन .कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करतांना इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्याचे फायदे सांगून नेतृत्व विकासाची संकल्पना स्पष्ट केली. रोटरीच्या अध्यक्षा रो. छाया पाटील यांनी आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना वास्तवात येण्यासाठी कुठलीही अडचण असल्यास आपण रोटरीच्या सदस्यांशी संपर्क करावा असे आवाहन करून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विविध कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले. प्रा. दिलीप भारंबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उत्स्फूर्त सभा धीटपणा बोलण्याचे कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले.
यावेळी इंटरॅक्ट क्लबच्या कार्यकारणीत अध्यक्ष – राजस धनंजय चौधरी, उपाध्यक्ष – शिवम शरद पाटील, सचिव – कैरवी दिलीप पाटील तर सदस्य म्हणून चंद्रशेखर तुकाराम पाटील, अंकिता संजय चौधरी, डेलिषा किरण पाटील, प्राची किशोर सारस्वत, सेजल राकेश महाजन, नेहा प्रदीप नाईक, मृणाली प्रभाकर जाधव, गौरव योगेश चौधरी, अमृता विनोद वाणी, तनुश्री रवींद्र दहाड यांची निवड करण्यात आली.
सूत्रसंचालन उपप्रमुख गिरीश भावसार यांनी केले तर उपस्थितांचे आभार इनटरॅक्ट प्रमुख योगेश चौधरी यांनी मानले.


