देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडीचा आनंद
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडीचा आनंद
अमळनेर प्रतिनिधी- धक्कामकुम धक्कामकुम गोविंदा आला म्हणत महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव येथे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला .विद्यार्थी -विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने दहीहंडीचा आनंद घेतला. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून उंचावर टांगलेली दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली होती .यात शेवटी आठवीतील विद्यार्थी तनुश्री सोनवणे तिने अचूकपणे दहीहंडी फोडली. तिचे अभिनंदन करण्यात आले.
दहीहंडीचा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी शाळेतील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मधील इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक अरविंद सोनटक्के, ईश्वर महाजन, एच.ओ.माळी,एस.के. महाजन व शिक्षकेतर कर्मचारी संभाजीराव पाटील यांनी प्रयत्न केले..


