29 ऑगस्ट 2024 पासूनचा प्रस्तावित” बेमुदत संप”पुढे ढकलला,महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
1 min read

29 ऑगस्ट 2024 पासूनचा प्रस्तावित” बेमुदत संप”पुढे ढकलला,महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)

Loading

29 ऑगस्ट 2024 पासूनचा प्रस्तावित” बेमुदत संप”पुढे ढकलला…

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)

मुंबई प्रतिनिधी
आज दि.27 ऑगस्ट 2024 रोजी दु.4-00 ते 7.30 वा पर्यंत समन्वय समितीची ऑनलाईन विस्तारित सभा संपन्न झाली. या सभेतील माहिती आपल्या संदर्भासाठी कळविण्यात येत आहे.
आपल्या दि.29 ऑगस्ट 2024 च्या नियोजित बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मा.मुख्यमंत्री महोदय यांचेशी आज दि.27 ऑगस्ट 2024 रोजी दु.1-00 वा. प्रलंबित मागण्यांसंबंधीसमन्वय समितीशी चर्चा झाली.राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पटलावर ठेवल्यानुसारच सुधारित निवृत्तीवेतन योजना राबविली जाईल असे अभिवचन देवून, इतर मागण्यासंबंधी निर्णायक चर्चा त्यांच्या व्यस्ततेमुळे 2/3 दिवसानंतर संपन्न होईल असे स्पष्ट केले.
*त्यामुळे दि.29 ऑगस्ट 2024 च्या संपाची बदललेली तारीख पुढील 4 सप्टेंबर 2024 रोजी समन्वय समितीची विस्तारित सभा घेऊन ठरविण्यात येईल.*
आजच्या आभासी सभेतील निर्णयाची नोंद घ्यावी.आपण बेमुदत संपाची जय्यत तयारी करण्यासाठी जे परिश्रम घेतले याचा महाराष्ट्र फेडरेशन ला अभिमान आहे. ज्ञानेश्वर कानडे,अध्यक्ष,
एस्.डी.भिरुड, सेक्रेटरी
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)
पालघर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *