न्यू व्हिजन स्कुल मध्ये गोपाळकाला निमित्त अवतरले गोविंदा  मुलीनेही साकारला गोविंदा,मुले व मुलींनी केली धम्माल
1 min read

न्यू व्हिजन स्कुल मध्ये गोपाळकाला निमित्त अवतरले गोविंदा मुलीनेही साकारला गोविंदा,मुले व मुलींनी केली धम्माल

Loading

न्यू व्हिजन स्कुल मध्ये गोपाळकाला निमित्त अवतरले गोविंदा

मुलीनेही साकारला गोविंदा,मुले व मुलींनी केली धम्माल

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरात सण आणि उत्सवात आघाडीवर असलेल्या न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये गोपाळकाला निमित्त गोविंदा अवरतल्याने हंडी फोडताना मुलं आणि मुलींनी मोठी धम्माल केली
विशेष म्हणजे मुलीनेही हंडी फोडण्याची करामत दाखविल्याने मोठा जल्लोष यावेळी साजरा झाला
मुले आणि मुली दोघांनाही स्वतंत्रपणे थर लावून हंडी फोडण्याचा आनंद देण्यात आला.यावेळी वरून राजाच्या आगमन होताच संगीताच्या तालावर मुले आणि मुली दोघांनीही गोविंदाच्या गाण्यांवर जोरदार ठेका धरला.भारतीय संस्कृतीचे जतन होऊन मुलाना आपल्या सण आणि उत्सवाचे नेहमी स्मरण राहावे यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या प्राचार्य प्रेरणा पाटील मॅडम व सुमित्रा झाँजोटे, वंदना मराठे ,दिपाली राजपुत, बागुल सर,वैभव आढाव,सिद्धार्थ शिरसाठ,भाग्यश्री अमोदेकर, सॅम सर, विद्या पाटील,अमोल पाटील, दिपाली पाटील,अनिता पाटील,श्रद्धा भंडारी, कामिनी महाजन, किरण पारीक, भौतिकी पटवर्धन,नेहा जाधव,मयूर पाटील, योगिता पाटील, कल्याणी यादव या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *