लोकमान्य विद्यालयात पालकसभा संपन्न!
![]()
लोकमान्य विद्यालयात पालकसभा संपन्न!
अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी पालकसभा उत्साहात पार पडली. या सभेला लोकमान्य विद्यालयाचे पालकसभा अध्यक्ष मनोहर महाजन तसेच उपाध्यक्ष नितीन जैन त्याचबरोबर प्रत्येक वर्गाचे पालकसभा प्रतिनिधी निवडही करण्यात आली. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले, पालक शिक्षक संघांची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच शासनाचे नवीन नियमांचाही आढावा घेण्यात आला. या सभेला पालक नितीन जैन, शरद ब्रह्मे, संजय बारी, तिलोत्तमा ठाकूर, रूपाली महाजन इ. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व पालक सभेचे अध्यक्ष मनोहर महाजन, जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, व पालक सभेचे सचिव मधुकर सोनार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

