देवगाव हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार व महावाचन अभियान संपन्न
![]()
देवगाव हायस्कूलमध्ये आनंददायी शनिवार व महावाचन अभियान संपन्न
![]()
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल अंतर्गत शासन परिपत्रकानुसार
आनंददायी शनिवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ घेण्यात आले.मुलांना बौद्धिक चालना मिळावी म्हणून प्रेरक कोडी सोडवून घेण्यात आल्या.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि त्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेत महावाचन अभियान राबविण्यात आले. मुलांनी वाचलेल्या पुस्तकातील आवडलेले प्रसंग, घटना स्वभाषेत सांगितल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ईश्वर महाजन यांनी केले. आनंददायी शनिवार या कार्यक्रमासाठी शाळेचे मराठीचे शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सुरेश महाजन, एच ओ माळी यांनी प्रयत्न केले.

