जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू- नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन  राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह  रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न
1 min read

जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू- नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न

Loading

जागतिक स्तरावर इस्रो भारताचा मानबिंदू-
नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त नोबेलतर्फे अवकाश जागरूकता सप्ताह

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल शाळेत उद्घाटन संपन्न

जळगांव प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो भारताचा मानबिंदू आहे असे प्रतिपादन इस्रोमॅन नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी केले. राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल व नोबेल फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित इस्रो:काल-आज आणि उद्या या व्याख्यानात ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार ,शाळेच्या मुख्याध्यापिका सीता तिवारी ,नोबेल फाउंडेशन चे संचालक राजेंद्र पाटील उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त आजपासून नोबेल फाउंडेशन तर्फे जिल्ह्यातील पंधरा शाळा व महाविद्यालयांमध्ये अवकाश जागरूकता संवाद प्रारंभ करण्यात आला, याचे पहिले सत्र उद्घाटन आज संपन्न झाले.
याप्रसंगी पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की ,भविष्यात भारतात अवकाश क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे. भारताचे अवकाश क्षेत्र आता हळूहळू खुले होत आहे.विद्यार्थ्यांनी भौतिक शास्त्र ,गणित या विषयांचा सखोल अभ्यास करावा जेणेकरून भविष्यात भारतात देखील इलोन मस्क सारखे उद्योजक घडतील. इस्रो ने भारताच्या शिरपेचात सन्मानाचे तुरे रोवले आहेत. रोहिणी रॉकेट पासून सुरू झालेला प्रवास गगनयान पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. इसरो मुळे सामान्य भारतीयांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाले असून भारतीयांच्या जीवनाची गुणवत्ता इस्रोमुळे वाढलेली आहे. कृषी,संरक्षण, दळणवळण, उद्योग, मनोरंजन या क्षेत्रांचे आधुनिकीकरण इस्रोमुळे झाले आहे.असेही ते म्हणाले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये अवकाश क्षेत्राशी संबंधित प्रश्नमंजुषा घेण्यात आली या प्रश्नमंजुषामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. एपीजे कलाम यांची पुस्तके भेट म्हणून देण्यात आली तसेच शाळेतर्फे या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक सौरभ शर्मा यांनी केले तर आभार उप प्राचार्य मीनल चौधरी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *