डॉ .सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा
1 min read

डॉ .सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा

Loading

डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला.

डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयात “अंतर्गत तक्रार व रॅगिंग प्रतिबंध” समिती तर्फे दि. १२ ऑगस्ट २०२४ रोजी रॅगिंग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीता बाजपाई या होत्या.
या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या दामिनी पथकाच्या प्रमुख मा. पोलीस उपनिरीक्षक कांचन मिरथे मॅडम यांनी विद्यार्थिनींना सांगितले कि आई वडील आपले कॉलेज ला जाणे बंद करतील या भीतीपोटी झालेला त्रास सांगत नाहीत त्यामुळे त्रास देणाऱ्याची हिम्मत वाढते, मुलींनी हे वेळीच आई वडिलांना व शिक्षकांना सांगितले पाहिजे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि आई वडिलांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. चुकीच्या मार्गाला जाण्या अगोदर या गोष्टीचा विचार करा, जीवन अनमोल आहे. आणि कोणी छेडछाड करीत असेल तर आम्हाला कळवा, तुमच्या संरक्षणासाठी आम्ही कायम उपलब्ध आहोत. मोबाईलचा वापर आवश्यक तेंव्हाच करा.
या वेळी व्यासपीठावर समिती प्रमुख डॉ. महानंदा दळवी , ज्योत्स्ना जावळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. माधुरी भावसार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. सुनीता बाजपाई म्हणाल्या कि विद्यार्थिनींनो मोबाईलचा वापर आवश्यक तेंव्हाच करा. समाजात घडणाऱ्या विविध अपप्रवृत्ती विषयी त्यांनी मार्गदर्शन केले , दामिनी पथक तुमच्या मदती करिताच आहे असेही त्या म्हणाल्या. त्यांनी दामिनी पथकाच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ” अंतर्गत तक्रार व रॅगिंग प्रतिबंध” समिती प्रमुख डॉ. महानंदा दळवी यांनी केले. सूत्रसंचालन कु. अनुजा काळे हिने केले. आभार प्रकटन “अंतर्गत तक्रार व रॅगिंग प्रतिबंध समिती सदस्य” ज्योत्स्ना जावळे यांनी केले.
हेड कॉन्स्टेबल कल्पना खरात, महिला पोलीस अंमलदार सुरेख कुकलारे, मनिषा तायडे मॅडम व सोनाली निकम मॅडम, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या निमित्त निबंध व पोस्टर प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेतील निबंध स्पर्धेत कु. पायल शुक्ला प्रथम, तानिया शेख द्वितीय, साक्षी गर्जे तृतिय आणि उत्तेजनार्थ मृणाल शेवाळकर, इंग्रजी भाषेची निबंध स्पर्धेत अनुजा काळे प्रथम, प्रतिक्षा लिंभारे द्वितीय आणि वेदिका खरे तृतिय , तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग प्रतिबंधा संदर्भात जागृती निर्माण व्हावी यासाठी भित्ती पत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत कु. गौरी कुलकर्णी हिने प्रथम, धनश्री पिंपळे -द्वितीय आणि आंचल साळवे हिने तृतीय क्रमांक पटकाविला, या सर्वाना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *