पालक आणि शिक्षकांनी वेळीच विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची गरज डॉ.मिलिंद बागुल
1 min read

पालक आणि शिक्षकांनी वेळीच विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची गरज डॉ.मिलिंद बागुल

Loading

पालक आणि शिक्षकांनी वेळीच विद्यार्थ्यांना समजावून घेण्याची गरज
डॉ.मिलिंद बागुल

शालेय जीवनामध्ये आपला पाल्य एका चांगल्या आणि सजग अशा जीवन वळणावर योग्य मित्राशी सवंगड्याशी संवाद साधतो किंवा नाही त्यासोबतच कुटुंबात आणि शाळेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाची योग्य अशी जडणघडण होते किंवा नाही हे समजावून घेत पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगात आपलसं करण्याची गरज असल्याचे मत मुख्याध्यापक तथा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल यांनी आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात पालक शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना व्यक्त केले यावेळी विचार मंचावर प्रीती पाटील,सुनील भोळे, डी.जी. महाजन उपस्थित होते.
सर्वोदय एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक विद्यालय असोदा येथे पालक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी पालक -शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, उपाध्यक्ष श्री किशोर चौधरी ,सचिव श्रीमती एम. के. कोल्हे ,सहसचिव भारती पाटील. नवीन कार्यकारिणीचे अध्यक्ष व माजी पदाधिकारी यांचे याप्रसंगी स्वागत करण्यात आले या सभेचे संचलन पालक -शिक्षक संघाच्या माजी सचिव श्रीमती अनिता पाटील यांनी केले ,तर आभार नूतन सचिव श्रीमती एम. के. कोल्हे यांनी मानले. सभेप्रसंगी बहुसंख्य पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात व शाळेतील विविध उपक्रमा संदर्भात समाधान व्यक्त केले व चर्चेत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *