राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम ‘प्रताप’ मध्ये हर घर तिरंगा अभियान
![]()
राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम
‘प्रताप’ मध्ये हर घर तिरंगा अभियान
—————————————–
अमळनेर : क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या १२ ऑगस्ट २०२४ च्या पत्रानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान *हर घर तिरंगा अभियान* राबविण्याचे निर्देश दिले आहेत.त्या नुसार राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर द्वारे दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी *हर घर तिरंगा अभियान 2024* अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य व सचिव खान्देश शिक्षण मंडळ डॉ.अरुण जैन यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे तिरंगा ध्वज वितरित केले. त्यानंतर शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानानुसार प्रत्येकाने आपल्या घरासमोर तिरंगा लावावा व सर्वांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.अरुण बी जैन यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे सह सचिव तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव व प्रा.डॉ.संदिप नेरकर याचप्रमाणे प्रा.योगेश पाटिल , प्रा. वैशाली महाजन, प्रा.भाग्यश्री जाधव, प्रा. डॉ.प्रमोद चौधरी, क्रीडा संचालक प्रा.सचिन पाटील, प्रा.डॉ.सुनिल राजपूत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना, एन सी सी, क्रीडा, विभागातील विद्यार्थी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी साठी प्रा. डॉ.सचिन नांद्रे (संचालक सेवा योजना) यांनी मार्गदर्शन केले.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी,कार्योपाध्यक्षय सीए नीरज अग्रवाल,कुलसचिव राकेश निळे,भटू चौधरी,देवेंद्र कांबळे यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ .हेमंत पवार यांनी केले तर महिला का कार्यक्रम अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी आभार मानले.

