२५ ऑगस्ट२०२४ला नगर येथे वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन समाजभान समृद्ध करणारे दुसरे सक्षम पाऊल- मावळते अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांचं मत
![]()
२५ ऑ.गस्ट२०२४ला नगर येथे वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन
समाजभान समृद्ध करणारे दुसरे सक्षम पाऊल-
मावळते अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांचं मत
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : वंजारी समाज हा महाराष्ट्रासह काही राज्यात वास्तव्यास असून अतिशय संघर्षातून व कष्टातून वाट काढीत स्वतःची ओळख निर्माण करीत आलाय. वर्तमानी समाज स्तर शिक्षणाने उंचावलाय हे जरी खरे असले तरी समाजातील शेतकरी शेतमजूर व शिक्षित बेरोजगार सांख्यिकी दृष्ट्या खूप आहेत.अशा वंचित घटकास न्याय मिळावा व तो बरोबरीने यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून संमेलनाचे सदरचे आयोजनअसल्याचे मत पहिल्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी आमच्या प्रतिनिधिकडे व्यक्त केले.
ते आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की,सहित्याचं ऋण अवघ्या मानव जातीवर असून साहित्यामुळेच मानवी जीवन आणि मन प्रत्येक काळात उन्नत होत गेलंय. यातून मिळणारा आनंद दृढ व्हावा व समाजभान समृद्ध व्हावे.यासाठी संमेलनाचे हे दुसरे सक्षम पाऊल आहे असे सांगत संमेलनास समाजातल्या बंधू भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अहिल्यानगर शहरातील निर्मलनगर परिसरात संत भागवनवबाब चौकात गंगा लॉन्सवर दि२५ ऑगस्ट२०२४ रोजी सकाळी ९वाजेपासून सायंकाळी ६वाजेपर्यंत होणाऱ्या साहित्य संमेलनात साहित्य दिंडी,उदघाटन समारंभ कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन यातून वाङ्मयीन मेजवानी मिळणार असल्याचे वांजरी महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. श्री. गणेशजी खाडे यांनी सांगितले.
संमेलनाचे अध्यक्ष नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिका मा.प्रा.डॉ.सौ.संगीताताई घुगे व उदघाटक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मा. प्रा.डॉ.गजाननराव सानप यांचे सह प्रमुख मान्यवर म्हणून नगरचे पालक मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील,खासदार मा. निलेश लंके,माजी खासदार मा. सुजय विखे पाटील,आमदार मा. संग्राम जगताप, शिर्डीचे खासदार मा. भाऊसाहेब वाघचौरे,माजी खासदार मा. सदाशिव लोखंडे,माजी महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मा. प्राजक्त तनपुरे,आमदार मा. मोनिकाताई राजळे,मा.रोहित पवार,मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ.नवनाथ आघाव,वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवन्त साहित्यिक मा. गणेशजी खाडे, पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष सुप्रसिध्द कवी मा. प्रा.वा.ना.आंधळे तसेच नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक मा.बुधाजीराव पानसरे या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती असणार आहे.
सदर संमेलन सर्वार्थाने यशदायी व्हावे म्हणून संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वविजेते कुस्ती खेळाडू मा.राजकुमार आघाव पाटील, सह स्वागताध्यक्ष रेणुका वराडे,सह स्वागताध्यक्ष घनश्याम बोडके,निमंत्रक जिल्हाध्यक्ष मल्हारी खेडकर, युवा जिल्हाध्यक्ष अर्जुन वायभासे प्रयत्नांची सरशी करीत आहेत.

