न्यू व्हिजन च्या चिमुकल्यांची महेश मेगा मार्ट ला भेट…
![]()
न्यू व्हिजन च्या चिमुकल्यांची महेश मेगा मार्ट ला भेट…
अमळनेर : आज न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या जूनियर व सीनियर केजी वर्गाने अंमळनेर शहरातील प्रसिद्ध महेश मेगा मार्ट येथे अभ्यास दौरा नेला. यावेळी मेगा मार्ट चे संचालक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिन व्यवहार कसा चालतो, ग्राहकांशी कसे सांभाळून संबंध वाढवावे, मॉल मध्ये माल कसा व कुठून येतो. नफा कसा कमविला जातो या बद्दल यथायोग्य माहिती दिली.
विद्यार्थांनी या वेळी बाजार व व्यवहार यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौऱ्याचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला. या दौऱ्याचे आयोजन विद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रेरणा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी सुमित्रा झाँजोटे, विद्या पाटील, भौतिकी पटवर्धन,श्रद्धा भंडारी, कामिनी महाजन,सॅम सर, माधुरी बाळापूरे, मीना पाटील आदी उपस्थित होते.

