शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज -बाळासाहेब राक्षे
![]()
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज -बाळासाहेब राक्षे
ठाणे येथे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ची प्रवेश सत्र सभा मोठ्या उत्साहात संपन्न!
ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, अध्यक्ष श्री. संजय शेंडे, व उपाध्यक्ष श्री. पितांबर महाजन व महासमादेशक श्री.अनिल शेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे नवी मुंबई,मुंबई, विभागातील व सर्व महानगरपालिका, नगरपालिका परिसरातील आर. एस. पी अधिकारी शिक्षक बंधू भगिनी यांची शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी ,ठाणे येथील एम.एच हायस्कूल शिवाजी महाराज पथ, स्टेशन जवळ ठाणे पश्चिम,येथे प्रवेश सत्र सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी माननीय डॉ.विनयकुमार राठोड,(पोलीस उपायुक्त ठाणे शहर वाहतूक विभाग ठाणे), यांच्या सहकार्याने,माननीय श्री.बाळासाहेब राक्षे प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली, पत्रकार संघाचे अध्यक्ष, संकल्प इंग्लिश स्कूलचे संस्थापक श्री.राज परब,समाजसेवक श्री.माणिक पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे विभागीय समादेशक श्री.दिलीप स्वामी, ठाणे,पालघर, नाशिक विभागाचे समादेशक डॉ. मनिलाल शिंपी, पालघर चे समादेशक श्री. शशिकांत पाटील, शिक्षक संघटनेचे कार्यतत्पर असे आमचे मित्र श्री.गोकुळ पाटील,प्रसिध्दी प्रमुख डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत नवी मुंबई, व ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील सर्व आर.एस.पी अधिकारी शिक्षक,इच्छुक अप्रशिक्षित आर.एस.पी. शिक्षक बंधू भगिनींनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश सत्र शुभारंभ सभा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्वचे आर एस पी अधिकारी श्री गवळे यांनी देशभक्तीपर राज्यगीत सादर केले.श्री.दिलीप स्वामी यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली.जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री.बाळासाहेब राक्षे यांनीही आर एस पी अधिकारी युनिट चे कौतुक करत सांगितले की , आजच्या परिस्थितीचा विचार करता रस्ता सुरक्षा अभियान,आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण कार्यशाळा आर एस पी व सी. डी.संघटन नागपूर महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत शिक्षकांकडून केले जात आहे ही शिक्षण विभागासाठी गौरवाची गोष्ट आहे.आज सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक बंधू भगिनींना खाकी वर्दीत पाहून मला खरोखर अभिमान वाटत आहे.आर एस पी हा विषय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून आत्मसात करणारा व महत्त्वाचा विषय आहे, सध्याच्या जीवनात घडामोडी पाहिल्या तर रोज आपण अनेक अपघात पाहतो परंतु त्याबद्दल आपण कोणताच विचार करत नाही. मात्र यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन झाले पाहिजे हे आपण विसरुन जातो, पंकज झाल्यानंतर अनेक प्रकार घडतात काहींचे डोळे जातात ,काहींना अपंगत्व येतो, काहींचे पाय जातात, काहींचे हात जातात अशा प्रकारे घटना घडत असतात त्यामुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांना कोणते वाहन चालवण्यास देऊ नये, जेणेकरून अपघात होणार नाही.
यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आर.एस. पी च्या माध्यमातून शालेय जीवनापासून वाहतुकीचे नियम शिकविणे काळाची गरज असे मार्गदर्शन करताना प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे श्री बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.यानंतर राज परब आणि समाजसेवक माणिक पाटील यांनी आर एस पी युनिट च्या कार्यास शुभेच्छा दिल्या.गोकुळ पाटील यांनीही आर एस पी अधिकारी युनिट च्या वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देत अभिनंदन केले. यावेळी,सहकार विद्यालयाचे श्री.संजय खैरनार यांना कळवा विभाग समादेशक म्हणून जबाबदारी देण्यात आली., ज्ञानसागर विद्यालय घाटकोपर चे श्री.तुकाराम साळुंखे(घाटकोपर समादेशक), ठाणे येथील एम.एच. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील, व संकल्प इंग्लिश हायस्कूलचे बाळासाहेब साठे यांना ठाणे शहर समादेशक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच भिवंडी शहर साठी आर एस पी अधिकारी श्री.देवरे , व ग्रामीण विभागासाठी, पडघा येथील हायस्कूलचे श्री मंगेश भामरे व श्रीराम धोंडळ यांच्याकडे समादेशक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. टिटवाळा, शहापूर परिसरातील समादेशक पदाची जबाबदारी आर एस पी अधिकारी श्री. दिक्षित यांच्या कडे देण्यात आली आहे. प्रवेश सत्र सभा यशस्वी करण्यासाठी सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक बंधू भगिनी यांनी विशेष सहकार्य केले.ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक जितेंद्र सोनवणे, शिशिर विकास हायस्कूलचे श्री. हंडाळ , बाळासाहेब साठे, दीक्षा जैन, संजय खैरनार, मंगेश भामरे, उमाकांत बोके, यांच्यासह इतरही आर एस पी अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.एम एच हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील यांनी उपस्थित सर्व आर एस पी अधिकारी शिक्षक बंधू भगिनींचे आभार व्यक्त केले.राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.

