आर्मी स्कूल मध्ये साजरा झाला `जागतिक आदिवासी व क्रांती दिन`
![]()
आर्मी स्कूल मध्ये साजरा झाला
`जागतिक आदिवासी व क्रांती दिन`
*अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला. शाळेचा माजी विद्यार्थी तथा सीआयएसएफ जवान जयेश साळुंके, अहिराणी कलाकार जयदीप पारधी, डॉ. भावेश पाटील, दीपक पारधी या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विज्ञान शिक्षक ए एन मालचे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य व्ही जी बोरसे, कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, हिंदी शिक्षक डी के पारधी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी “व्हाईस ऑफ मीडिया”च्या तालुकाध्यक्षपदी उमेश काटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गीत गायन स्पर्धा व डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. उत्कृष्ट गीत व नृत्याला दानशूर व्यक्तींनी रोख बक्षिसे दिली. पी सी पाटील व एल एम भोंडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. राज चव्हाण याने सूत्रसंचालन केले. भावेश पाटील याने आभार मानले.*

