अमळनेरात प्रवासी आणि टॅक्सी चालकांसाठी पीकअप शेडचे थाटात लोकार्पण मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांच्या मागणीला आले मूर्त स्वरूप
1 min read

अमळनेरात प्रवासी आणि टॅक्सी चालकांसाठी पीकअप शेडचे थाटात लोकार्पण मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांच्या मागणीला आले मूर्त स्वरूप

Loading

अमळनेरात प्रवासी आणि टॅक्सी चालकांसाठी पीकअप शेडचे थाटात लोकार्पण
मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षांच्या मागणीला आले मूर्त स्वरूप

अमळनेर प्रतिनिधी-येथील बस स्थानका शेजारील टॅक्सी स्टँडवर प्रवासी बांधवाचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून असताना मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतुन भव्य पिकअप शेड उभारले गेल्याने या कामाचे थाटात लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त उत्तर महाराष्ट्र टॅक्सी महासंघ मेळाव्याचे आयोजन देखील अमळनेरात करण्यात आले होते,

माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी टॅक्सी स्टँड ही मोठी भेट मंत्री पाटील यांनी दिली असून या तालुक्यातील प्रत्येक घटकासाठी व विशेष करून पाडळसरे धरणासाठी ते खूप काही करीत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत सर्वानी त्यांनाच साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जळगाव युनियन चे अध्यक्ष रजाक गनी खान,देविदास देसले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंत्री पाटील यांचा युनियन तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी अमळनेर युनियन चे अध्यक्ष बंडू केळकर,धुळे युनियन अध्यक्ष शिवाजी शेंडे,शहादा युनियन चे अरुण चौधरी,पारोळा युनियन चे आबा चौधरी,चोपडा युनियन चे राजू पाटील तसेच अमळनेर युनियन चे राजेंद्र परदेशी,ईश्वर पाटील,ईश्वर देशमुख,सुनिलदत्त रणधीर,मेहमूद खा पठाण,गणेश महाजन,प्रकाश पवार,विठ्ठल शिंदे,कैलास पाटील,नितीन पाटील,यासह सर्व चालक व मालक सदस्य, प्रवासी बांधव आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *