अमळनेर शहरातील नागरिकांना नियमित विज मिळावी व गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या..  अमळनेरला अतिरिक्त कार्यकारी अभियंताला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे निवेदन
1 min read

अमळनेर शहरातील नागरिकांना नियमित विज मिळावी व गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या.. अमळनेरला अतिरिक्त कार्यकारी अभियंताला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे निवेदन

Loading

अमळनेर शहरातील नागरिकांना नियमित विज मिळावी व गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या..

अमळनेरला अतिरिक्त कार्यकारी अभियंताला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात बत्ती गुल झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अवेळी लाईट गेल्यामुळे गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. वास्तविक उन्हाळ्यात सुद्धा आपल्या अमळनेर शहराला नियमित वीज मिळत होती. महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात वीज असताना सुद्धा अमळनेर शहरात पूर्वसूचना न देता लाईट जाते याला काय म्हणावे?
या निवेदनाद्रारे आपणास विनती करतो की अमळनेर शहरातील नागरिकांना नियमित विज मिळावे व गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती आपणास करीत आहोत. दिलेल्या निवेदनावर योग्य उपाय योजना केल्या नाहीत तर पुढील काळामध्ये नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल याची पूर्व सूचना आपणांस देत आहोत.
तसेच शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता अडचणी निर्माण होतात तसेच पावसाळ्यात देखील प्रचंड उकाळा होत असतांना लाईट गेल्यावर नागरिकांचे हाल होतात. अनेक व्यावसायिक यामुळे अस्त झाले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात परंतु लाईट गेल्यामुळे त्यांच्या कोणतेही काम होत नाही. परिणामी तेवढ्याच कामासाठी त्यांना ग्रामीण भागातून फेऱ्या माराव्या लागत आहेत.

निवेदन देते प्रसंगी
युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे,शिवकिरण बोरसे, कल्पेश पाटील,गौरव सोनार,सौरभ पाटील,सागर बारी,निनांद जोशी,पवन बारी देवा भोई,सागर बारी,विजय महाजन.उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *