डॉ.जिजाबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन  त्यांची अंत्ययात्रा उद्या 28 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील संत सखाराम महाराज नगर येथून राहत्या घरून निघणार
1 min read

डॉ.जिजाबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन त्यांची अंत्ययात्रा उद्या 28 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील संत सखाराम महाराज नगर येथून राहत्या घरून निघणार

Loading

डॉ.जिजाबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

त्यांची अंत्ययात्रा उद्या 28 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील संत सखाराम महाराज नगर येथून राहत्या घरून निघणार

अमळनेर प्रतिनिधी- गेल्या अनेक वर्षापासून अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील गजानन परिवारामध्ये नित्य भावे सेवा करणारे,मितभाषी, गजानन महाराजांचे कट्टर भक्त, प्रत्येक गजानन पायी वारीमध्ये मदत करणारे डॉक्टर जिजाबराव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे संपूर्ण अमळनेर शहरात तालुक्यात व गजानन परिवारावर दुःखाचे संकट कोसळले..
सविस्तर माहिती अशी कि डॉ.जिजाबराव सुरेश पाटील वय – 47 रा.कावपिंप्री यांचे काल दि. 27 रोजी दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ते मूळचे जळगाव तालुक्यातील चांदसर येथील रहिवासी होते, मात्र सासरवाडी कावपिंप्री येथे अनेक वर्षा पासून प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, 1 मुलगा, 1 मुलगी असा परिवार असून त्यांची अंत्ययात्रा दि.28 रोजी सकाळी 10 वाजता अमळनेर येथील संत सखाराम महाराज नगर येथून निघणार आहे.

त्यांच्या परिवारावर जे दुःखद संकट कोसळले आहे परमेश्वर ते सहन करण्याची परिवाराला शक्ती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली
शोकाकुल
अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार व सर्व विश्वस्त मंडळ संत गजानन महाराज सेवा संस्था
दादासाहेब सोनार नगर अमळनेर

महिला वारी प्रमुख सौ ज्योतीताई पवार सर्व गजानन महिला परिवार अमळनेर

डॉक्टर प्रशांतजी शिंदे साई हॉस्पिटल आणि परिवार अमळनेर
तालुका डॉक्टर असोसिएशन व सर्व मेडिकल अमळनेर

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *