अमळनेर च्या डि.ए.धनगर सरांची कन्या जिज्ञानाची स्पर्धा परीक्षेतून भरारी…  धनगर समाजाचा लेकीचा अभिमान व कौतुकाचा वर्षाव
1 min read

अमळनेर च्या डि.ए.धनगर सरांची कन्या जिज्ञानाची स्पर्धा परीक्षेतून भरारी… धनगर समाजाचा लेकीचा अभिमान व कौतुकाचा वर्षाव

Loading

अमळनेर च्या डि.ए.धनगर सरांच्या कन्या
जिज्ञानाची स्पर्धा परीक्षेतून भरारी…

धनगर समाजाचा लेकीचा अभिमान व कौतुकाचा वर्षाव

एकाच वेळी तीन परीक्षा पास झाल्याचे रेकॉर्ड ब्रेक..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सरकारी सेवेते जाण्याचे स्वप्न राज्यातील अनेक तरुण पाहत असतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी रात्रंदिवस करत असतात. मनात जिद्द आत्मविश्वास,मेहनत करण्याची इच्छा असेल तर आपले स्वप्न सत्यात उतरते असेच स्वप्न साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक डि.ए धनगर यांची मुलगी जिज्ञासा धनगर हिने एकाच वेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तीन परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..
सविस्तर माहिती अशी कि स्पर्धा परीक्षेतून जळगांव जिल्ह्यात एकाच वेळी तीन सरकारी नोकरीची (class -2) ऑर्डर मिळवण्याचे रेकॉर्ड न्हायदे सर वर्डीकर यांची सुनबाई व डी.ए धनगर सर अमळनेर यांची सुकन्या सौ.जिज्ञासा BE सिव्हिल इंजिनिअर ची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी एकाच वेळी तीन विविध पदांसाठी कौतुकास्पद निवड झाली..
1) जूनियर इंजिनियर ZP जळगाव
2) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदी (महिलांमध्ये प्रथम)
3)डब्ल्यू.आर.डी. विभागात जूनियर इंजिनियर
वरील तीन विविध पदांसाठी निवड समिती मार्फत पात्र झालेल्या आहेत.
एकाच वेळी तीन पदांसाठी निवड झालेल्या त्या जळगाव जिल्ह्यातील एक मात्र महिला आहेत.
पैकी एका पदावर त्या लवकरच शासकीय सेवेत (class-1) पदार्पण करणार आहे..
तिचे अभिनंदन साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे, संचालक मंडळ, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील शिक्षक वृंद व साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे व सर्व शिक्षक वृंद, सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक सतीश देशमुख,व
अमळनेर तालुक्यातील मित्रपरिवार , मुख्याध्यापक शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे..

चौकट
मनात जिद्द व आत्मविश्वास असेल तर आपण आपले स्वप्न सत्यामध्ये उतरू शकते. मी आधीच स्पर्धा परीक्षेचे स्वप्न पाहिले होते यासाठी मला माझ्या गुरूंनी ,आईवडील यांचे मार्गदर्शन मिळाले ..आज एकाच वेळी तीन परीक्षा पास झाल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.. आजच्या तरुण पिढीने भरपूर मेहनत घेतली तर तुमचे यश कोणीच रोखू शकत नाही असे तिने बोलतांना सांगितले.

जिज्ञासा धनगर अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *