महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६२ वा वर्धापन दिन कै.बापूसो एन झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित, मतिमंद मुलांची कार्यशाळा ,वाघाडी ता.शिरपूर येथे संपन्न 
1 min read

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६२ वा वर्धापन दिन कै.बापूसो एन झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित, मतिमंद मुलांची कार्यशाळा ,वाघाडी ता.शिरपूर येथे संपन्न 

Loading

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६२ वा वर्धापन दिन कै.बापूसो एन झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित, मतिमंद मुलांची कार्यशाळा ,वाघाडी ता.शिरपूर येथे संपन्न 

धुळे प्रतिनिधी
आज दि.२२/०७/२०२४ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६२ वर्धापन दिनानिमित्त संघटनेच्या तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व (मिष्टान्न भोजन) बट्टी ,डाळ भात ,मट मुगाची भाजी व जिलेबी जेवण देण्यात आले.
ह्या प्रसंगी समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र पाटील सर ,बापू पारधी सरचिटणीस मनोज निकम कार्याध्यक्ष, जितेंद्र राजपूत कोषाध्यक्ष, ज्ञानेश्वर धनगर विभागीय उपाध्यक्ष ,गोकुळ पाटील उपाध्यक्ष,राजेश पाटील सल्लागार,सुनील सोंजे सल्लागार ,सुभान पगारे साक्री तालुकाध्यक्ष ,गोकुळ सोनार शिंदखेडा तालुकाध्यक्ष ,रोहिदास बोरसे सल्लागार, गोपाल लोहार संघटक ,वसंत साटोटे संघटक ,सैंदाणे सर शिरपूर तालुकाध्यक्ष तसेच विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
समितीच्या तर्फे कार्यशाळा व्यवस्थापक सुनील पाटील सर ,आर.एस.जाधव सर व समन्वयक गणेश निकुंभ सर यांचा सत्कार करण्यात आला.व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार कार्यशाळेचे गृहपाल कल्पेश माळी यांच्यातर्फे तर समितीचे सरचिटणीस यांचा सत्कार वाघाडी कार्यशाळा समन्वयक सचिनभाऊ तेले यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच समितीच्या वतीने प्रवेशित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मिष्टान्न भोजन देण्यात आले. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र पाटील सर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले तसेच सेवेव्रत कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुणगौरव केला व पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पावरा सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यशाळा व्यवस्थापक सुनील पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *