नितीनच्या पुण्यस्मरण निमित्ताने 27 वर्षापासून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप..
![]()
नितीनच्या पुण्यस्मरण निमित्ताने 27 वर्षापासून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप..
अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब रमेश चिंधा चौधरी यांचा मुलगा नितीन रमेश चौधरी इयत्ता नववीच्या वर्गात असतांना 27 वर्षांपूर्वी त्याचे अल्पशा आजाराने निधन झाले.. निधनाचा धक्का परिवाराला मोठा होता.. त्यात नितीनच्या स्मृतींना उजाळा व त्याच्या आठवणी निरंतर रहाव्यात म्हणून यासाठी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप गेल्या 27 वर्षापासून निरंतर चौधरी परिवार करीत आहे..
सविस्तर माहिती अशी कि २२ जुलै १९९७ रोजी आपला नितीन इयत्ता नववीत असताना अचानक अल्पशा आजाराजातून निघून गेला.त्याच्या स्मृती सदैव आठवणीत असाव्या म्हणून मागील २७ वर्षापासून इयत्ता नववीच्या वर्गात वस्तू वाटप करत असतो,ह्या वर्षीही त्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून नववी च्या वर्गात शालोपयोगि वस्तू वाटप केलेत.यावेळी कै नितीन चे वडील आबासाहेब रमेश चिंधा चौधरी,व
संजय निंबा चौधरी,रवींद्र कौतिक महाजन, प्रशासन अधिकारी भाऊसाहेब जी टी टाक , शिक्षक व्ही पी महाजन सर, पी.बी क्षीरसागर मुनाफ तडवी उपस्थित होते.

