कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवितांना अतिशय घाई घाईने जाणीवपूर्वक अयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने जो उद्रेक झालाय त्याला पूर्णतः सरकार व प्रशासन जबाबदार-संदीप घोरपडे जिल्हासरचिटणीस काग्रेस पक्ष जळगांव
![]()
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवितांना अतिशय घाई घाईने जाणीवपूर्वक अयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने जो उद्रेक झालाय त्याला पूर्णतः सरकार व प्रशासन जबाबदार-संदीप घोरपडे जिल्हासरचिटणीस काग्रेस पक्ष जळगांव
अमळनेर प्रतिनिधी
दिनांक बावीस जुलै 2024 रोजी अमळनेर शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात न्यायाची मागणी करण्यासाठी अमळनेर प्रांत कचेरीवर धडकले त्यांच्या समवेत विविध क्षेत्रातील अनेक समाजातील धुरीनांनी हजेरी लावली यात प्रामुख्याने काँग्रेस तालुका अध्यक्ष बीके सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे गोकुळ बोरसे किडी पाटील अनिल शिंदे तिलोत्तम पाटील भागवत सूर्यवंशी इम्रान खाटीक अजहर सय्यद युवक अध्यक्ष एडवोकेट शकील काजी यासह अनेक नामवंत व्यक्ती सदर मोर्चात येऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी आपले मत व्यक्त करताना काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी एकूणच महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती दिली या माहितीत हेरिटेज यादीमध्ये अर्थात पुरातत्व विभागाच्या यादीत गडकिल्ल्यांवरील विविध प्रकारच्या स्थावर जंगम मालमत्तांची माहिती दिली यामध्ये विविध किल्ल्यांवर लोकवस्तीचे पुरावे प्रांताधिकारी आणि प्रशासनासमोर मांडले यात मुंबई येथून जवळच असलेली घारापुरी येथे लोक वस्तीचा पुरावा दिला प्रतापगडावरील लोकवस्ती व दुकानांची माहिती दिली त्याचप्रमाणे जंजिरा किल्ला तसेच इतर अनेक ऐतिहासिक गड किल्ल्यांची माहिती सांगताना यात मुस्लिम समाजाचे योगदान अधिक मोठे असल्याचे सांगितले व शिवाजी महाराजां समवेत राज्य स्थापनेत विविध जाती धर्माच्या 18 पगड मावळ्यांचा समावेश असल्याने तिथे शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला मानाचे स्थान दिलेले आहे एवढेच नाही तर प्रतापगड किल्ल्यावरील आपला शत्रू अफजलखानाची कबर देखील बांधून विविध धर्मात सलोखा राखण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले आणि आज मात्र देशाचे गृहमंत्री देशातील मणिपूर अथवा काश्मीरमधील अत्याचाराकडे साफ काना डोळा करतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्राचे गृहमंत्री अतिशय सुसंस्कृत बनवल्या गेलेल्या पुणे शहरात मैदानात उतरा ठोकून काढा अशा प्रकारची भडकाऊ भाषणे करून समाजमन विचलित करण्याचे काम करीत आहेत यावर हल्लाबोल चढविला व आम्ही समाजात शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करणारे कार्यकर्ते पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक तंदुरुस्त राखण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून आम्ही इथे येऊन आपणांसमोर हे निवेदन देत आहोत की महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला आमचे म्हणणे कळवा व महाराष्ट्राची स्थिती अधिक बिघडू नये याकरता सर्वांनी हातभार लावावा असे आपल्या वक्तव्यातून सांगितले त्यानंतर अशोक पवार आरिफ भाई के डी पाटील अधिवक्तांचे भाषण होऊन निवेदन देऊन मोर्चेकरी शांततेत आपापल्या घरी परत गेले
निवेदनावर यांच्या होत्या सहया..
या निवेदनावर स्वाक्षरी हाजी नासिरोद्दीन शेख, अध्यक्ष, अमळनेर मुस्लिम शहर कमेटी, सैय्यद अजहर अली, सईद हाजी, नाविद शेख,अल्तमश शेख, आकीब अली, अख्तर अली,जुबेर पठाण, इम्रान भाया, मा.नगरसेवक फिरोज पठाण, मा.नगरसेवक सलीम टोपी, आरिफ भाया, हाजी दबीर पठाण, साबीर पठाण, मुख्तार खाटीक, इम्रान खाटीक, एड, शकील काझी गुलाम नबी पठाण, सौय्य आबीद अली, मुश्ताक शेख, इम्रान कादर शेख, ताहेर शेख, रियाज मौलाना, आरिफ पठाण, बशीर शेख, ईबा सैय्यद, अल्ताफ राजा, अरशद पठाण, वलीद शेख, शाहिद शेख,नाईम पठाण , मोसीन शेख,सलमान शेख, आदी व विशेष उपस्तिथी संदीप घोरपडे, के डी पाटील, मनोज पाटील, डाँ,अनिल शिंदे, अशोक पवार, गुकोळ बोरसे, सर,तिल्लोतमा ताई, ब के सूर्यवंशी, भागवत गुरुजी, प्रवीण जैस..

