संत गजानन महाराज मंदिरात गुरूपोर्णीमा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न अभिषेक, पाद्यपूजन ,सामूहिक पारायण,सार्वजनिक आरती, मारवड येथील गजानन महाराज पायीवारीचे झाले स्वागत
![]()


संत गजानन महाराज मंदिरात गुरूपोर्णीमा निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न
अभिषेक, पाद्यपूजन ,सामूहिक पारायण,सार्वजनिक आरती, मारवड येथील गजानन महाराज पायीवारीचे झाले स्वागत…
अमळनेर प्रतिनिधी
आषाढ महिन्यातील पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. या सणाचे औचित्य साधत अमळनेर येथील दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात गुरूपोर्णीमा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी कि आज सकाळी पादयपूजन,अभिषेक करण्यात आला. महीला वारीच्या प्रमुख ज्योतीताई पवार यांच्या संकल्पनेतून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अखंड पारायण ग्रुपला चांगला प्रतिसाद मिळाला.. संत गजानन महाराज मंदिरात सामूहिक अखंड पारायण करण्यात आले.मारवडहून अमळनेरला संत गजानन पायीवारीतील 120 भक्तांचे स्वागत करण्यात आले.
*यांचा झाला सन्मान*
गजानन परीवारासाठी योगदान देणाऱ्या भक्तगणासाठी गजानन महाराजांची भव्य मोठी प्रतिमा भेट गजानन महाराज संस्थांनचे अध्यक्ष आर.बी पवार व महिलावारी प्रमुख ज्योतीताई पवार व गजानन भक्तांच्या हस्ते राजेंद्र बागुल, भाऊसाहेब ए.बी.पाटील, एम यु शिंपी, प्रतिभा नेरकर ताई, इंदिराताई येवले, नितीन पाटील कोळप्रिपी यांना सन्मानपूर्वक सत्कार करून देण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मारवड संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य एल.जे.चौधरी सर यांनी केले.
*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी केले प्रयत्न*
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.आर.बी.पवार, ज्योतीताई पवार,गजानन परीवारातील महीला भगिनी,
अशोक भावे,नितीन भावे,सेवेकरी रघूनाथ
पाटील, विश्वास पाटील, मोहीत पवार,संजय पाटकरी,परेश पाटील,
विजू येवले,सनी पाटील, विवेक पाटील, देवेंद्र चौधरी, मनिष पाटील, रूपेश पवार,पकंज येवलेसह व सर्व गजानन भक्त व महीला यांनी प्रयत्न केले.
यावेळी गजानन परीवारातील बंधू भगिनी यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

